शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! नाशिक TCS प्रकरणातील मुख्य संशयित निदा खानला अटक; २५ दिवसांपासून होती फरार
2
“...तर सामूहिक राजीनामे देऊ”, TVK आमदारांचा थेट इशारा; विजयसमोर मोठाच पेच, घडामोडींना वेग!
3
IPL 2026 : LSG अभी जिंदा है...! गत चॅम्पियन RCB च्या संघाने पराभवासह 'नंबर वन'ची संधी गमावली
4
जगापासून लपवले, सॅटेलाइटने सगळे टिपले; इराण हल्ल्यात अमेरिकेची १५ तळावरील २२८ ठिकाणे बेचिराख
5
“भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
6
धक्कादायक! काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा महिला आमदाराला जबरदस्ती मिठी मारण्याचा प्रयत्न; धक्का देत केलं दूर, VIDEO व्हायरल
7
प्रिन्ससमोर 'किंग' चारीमुंड्याचित! अचूक टप्पा अन् काही कळण्याआधीच विराट कोहलीचा त्रिफळा उडला (VIDEO)
8
पश्चिम बंगालमध्ये ममता राज संपुष्टात! राज्यपालांकडून मंत्रिमंडळ बरखास्त; आता होणार भाजप युगाची सुरुवात
9
मिचेल मार्शचं वादळी शतक! LSG नं २०९ धावा केल्यावर RCB ला मिळालं २१३ धावांचं लक्ष्य; कारण...
10
गुंतवणूकदारांची चांदी! देशातील सर्वात महागड्या शेअरकडून 'डिविडेंड' जाहीर, एका स्टॉकची किंमत १३००००; किती मिळणार लाभांश?
11
Mitchell Marsh Fastest Century: मिचेल मार्शचा मोठा पराक्रम; जलद शतकी खेळीसह रिषभ पंतचा विक्रम मोडला
12
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
13
SSC Result 2026: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार रिझल्ट; 'या'वेबसाईटवर पाहा
14
“सीमावर्ती भागात जाऊ नये”; बांगलादेशचे नागरिकांना आवाहन, प. बंगालमध्ये भाजपा येताच सतर्क
15
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर
16
Bhuvneshwar Kumar: स्विंगचा किंग भुवीनं रचला इतिहास; IPL मध्ये 'हा' मैलाचा पल्ला गाठणारा ठरला पहिला
17
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
18
Nagpur Crime : धक्कादायक ! २१ वर्षीय तरुणाकडून सावत्र आईवर बलात्कार; पीडिता चार महिन्यांची गरोदर
19
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
20
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
Daily Top 2Weekly Top 5

नाना-नानी पार्क अद्याप उद्घाटनाच्या प्रतीक्षेत

By admin | Updated: April 16, 2015 00:09 IST

गुहागर नगरपंचायत : विहिरीचे काम अद्याप बाकी

गुहागर : गुहागर समुद्रकिनारी वनविभागाच्यावतीने पर्यटन निधीतून पर्यटक व स्थानिक ग्रामस्थांसाठी उभारण्यात आलेले नाना - नानी पार्क तीन वर्षांपासून उद््घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. वनविभाग व ग्रामीण पाणी पुरवठा विभाग यांच्यामध्ये समन्वय नसल्याने विहिरीचे काम रखडले आहे.भास्कर जाधव राज्यमंत्री असताना वनविभाग खाते त्यांच्याकडे होते. गुहागर समुद्रकिनारा पर्यटक तसेच स्थानिकांना वेगळे आकर्षण ठरावे, तसेच ज्येष्ठ नागरिकांनाही दररोज निवांत वेळ घालवता यावा, या हेतूने गुहागर पोलीस परेड मैदानाच्या मागे असणाऱ्या सुरुबनामध्ये नाना-नानी पार्क उभारण्यात आले आह. या पार्कचे काम होऊन तीन वर्षांहून अधिक काळ लोटला तरी उद्घाटन होऊ शकलेले नाही.जवळपास १० गुंठ्यांहून अधिक क्षेत्रामध्ये असलेल्या पार्कमध्ये बसण्यासाठी चारही बाजूंनी लोखंडी बाजू बसवण्यात आले आहेत, तर सर्व क्षेत्रामध्ये हिरवळीचे अच्छादन (प्लॅन) तयार करण्यात आले आहे. ही हिरवळ वर्षभर कायम ठेवण्यासाठी पावसाळावगळून इतरवेळी मोठ्या प्रमाणात पाणी लागते.
यासाठी २०११ मध्ये या पार्कमध्ये वन विभागामार्फत विहिरीसाठी आवश्यक कागदोपत्री पूर्तता करण्यात आली. त्यासाठी लागणारा शासकीय निधीसाठी ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडे देण्यात आल्याचे वनपाल राजश्री कीर यांनी सांगितले.
याबाबत ग्रामीण पुरवठा विभागाचे भोजे यांनी याबाबतचा प्रस्ताव जिल्हास्तरावर पाठवण्यात आल्याचे सांगितले. या प्रस्तावामध्ये काही तांत्रिक त्रुटी होत्या. मात्र, याबाबत प्रस्ताव दिल्यानंतर वन विभागामार्फत कोणताही संपर्क न झाल्याने या त्रुटी तशाच राहून प्रस्ताव तसाच राहिला. वनविभाग व ग्रामीण पाणी पुरवठा विभाग हे दोन्हीही शासनाचे विभाग असताना केवळ दोघांमध्ये समन्वय नसल्याने नाना-नानी पार्क पूर्ण होऊनही सर्वांसाठी खुले होऊ शकलेले नाही.सध्या या पार्कमधील हिरवळ कायम ठेवण्याकरिता पावसाळ्याव्यतिरिक्त इतर महिने खासगी टँकरने पाणी शिंपावे लागत आहे. तसेच या प्रस्तावामधील त्रुटी दूर करुन याचे कंत्राट दिले गेले असल्याने पार्कमध्ये विहिरीचे काम लवकरच सुरु होईल, असे ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता भोजे यांनी यावेळी बोलताना सांगितले. (प्रतिनिधी)