शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणपुढे अद्याप ४८ कोटी थकबाकी वसुलीचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:32 IST

रत्नागिरी : महावितरणपुढे थकबाकीचा प्रश्न गंभीर बनला आहे. जिल्ह्यातील १ लाख २२ हजार ५६४ ग्राहकांनी अद्याप वीजबिल न भरल्यामुळे ...

रत्नागिरी : महावितरणपुढे थकबाकीचा प्रश्न गंभीर बनला आहे. जिल्ह्यातील १ लाख २२ हजार ५६४ ग्राहकांनी अद्याप वीजबिल न भरल्यामुळे ४८ कोटी ५५ लाख रुपयांची थकबाकी आहे.

कोरोना काळात तीन महिने वीजबिले न देता एकत्रित तीन महिन्यांची बिले देण्यात आली होती. मात्र, ग्राहकांकडून मोठ्या रकमेची वीजबिले असल्याने भरली गेली नाहीत. त्यातच सरकारकडून वीजबिल माफीचे आश्वासन देण्यात आले होते. वीजबिल माफ होईल, या आशेने ग्राहकांनीही वीजबिले न भरल्यामुळे महावितरणपुढे थकबाकीचा डोंगर उभा राहिल्याने वसुलीचे आव्हान उभे ठाकले.

रत्नागिरी जिल्ह्यातील ९८,९७२ घरगुती ग्राहकांकडे २० कोटी ४० लाख, वाणिज्यिक ९,९३९ ग्राहकांकडे ८ कोटी १९ लाख, औद्योगिकच्या १,३२५ ग्राहकांकडे ५ कोटी ४६ लाख रुपये थकबाकी आहे. उच्चदाब व पाणीपुरवठा योजना इत्यादी मिळून जिल्ह्यातील तब्बल १ लाख २२ हजार ५९४ थकबाकीदारांकडे ४८ कोटी ५४ लाख ७४ हजार रूपयांची थकबाकी आहे.

रत्नागिरी विभागातील ५७,८३५ ग्राहकांकडे २२ कोटी ३५ लाख ९५ हजार, चिपळूण विभागातील ३३,११० ग्राहकांकडे १४ कोटी २२ लाख १३ हजार, खेड विभागातील ३१,६१९ ग्राहकांकडे ११ कोटी ९६ लाख ६७ हजार रूपयांची थकबाकी आहे.

थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यासाठी महावितरणचे कर्मचारी गेले असता काही ग्राहकांकडून थोडीफार रक्कम देऊन वीज पुरवठा खंडित न करण्याची विनंती करण्यात येते. परंतु थकबाकीची पूर्ण रक्कम वसूल न झाल्याने थकबाकीचा डोंगर वाढतच आहे. ग्राहकांना वीजबिले भण्यासाठी महावितरणकडून टप्प्याटप्प्याने सवलत देण्यात आली आहे. ऑनलाईनही सुविधा उपलब्ध केली होती, मात्र, ग्राहकांडून थकीत रकमेच्या तुलनेत किरकोळ रकमेचाच भरणा करण्यात येत असल्याने ऑनलाईन सवलत बंद करण्यात आली आहे. ग्राहकांना उपविभागीय कार्यालयात थकीत रकमेचे टप्पे आखून देण्यात येत आहेत. त्यानुसारच ग्राहकांनी थकीत रकमेचा भरणा करावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.