शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
4
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
5
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
6
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
7
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
8
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
9
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
10
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
11
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
12
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
13
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
14
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
15
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
16
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
17
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
18
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
19
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
20
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

लांजात अंगणवाडी सेविकांचे मोबाइल वापसी आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:36 IST

लांजा : महाराष्ट्र शासनातर्फे अंगणवाडी सेविकांना देण्यात आलेल्या मोबाईलमध्ये सातत्याने बिघाड होत असल्याने तसेच मोबाईल ॲपमध्ये असलेल्या इंग्रजी भाषेमुळे ...

लांजा : महाराष्ट्र शासनातर्फे अंगणवाडी सेविकांना देण्यात आलेल्या मोबाईलमध्ये सातत्याने बिघाड होत असल्याने तसेच मोबाईल ॲपमध्ये असलेल्या इंग्रजी भाषेमुळे आवश्यक असलेली माहिती भरणे अवघड होत असल्याने मोबाइलचा काहीच उपयोग होत नसल्याने सोमवारी अंगणवाडी सेविकांना मोबाइल वापसी आंदोलन करत शासनाला मोबाइल परत केले आहेत.

शासनाने अंगणवाडी सेविकांना त्यांची ऑनलाइन माहिती व हजेरी देण्यासाठी मोबाइल प्रत्येक अंगणवाडी सेविकांना देण्यात आले होते. मात्र, मोबाइल सातत्याने बंद पडत असल्याने त्याची दुरुस्ती करण्यासाठी पैसे मोजावे लागत आहेत. माहिती भरण्यासाठी ॲपमध्ये इंग्रजी भाषा असल्याने माहिती भरताना अडचण निर्माण होते. ग्रामीण भागामध्ये मोबाइलला रेंज नसल्याने माहिती भरायची कशी, असा प्रश्न अंगणवाडी सेविकांना भेडसावत होता. सोमवारी तालुक्यातील अंगणवाडी सेविकांनी बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्या कार्यालयासमोर मोबाइल वापसी आंदोलन करत बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्या टेबलावर मोबाइल ठेवून घोषणाबाजी केल्या. यावेळी मागण्यांचे निवेदनही देण्यात आले.

------------------------

शासनाने दिलेल्या मोबाइलमध्ये माहिती भरताना अडचण निर्माण होत आहे, ही वस्तुस्थिती आहे. आम्ही शासनाला पत्रव्यवहार करून मार्गदर्शन मागविणार आहोत. मोबाइल ट्रॅकरचे काम थांबणार असल्याने दररोजचे हजेरीचे कामही लागणार नाही. त्यामुळे पुढे काम करताना अडचण निर्माण होणार आहे.

- संपदा भागवत, बाल विकास प्रकल्प अधिकारी लांजा.

-----------------------

नादुरुत मोबाईलमुळे शासनाला माहिती भरण्यासाठी अडचणी येत आहेत. या मोबाइलवर काम करणे कठीण आहे म्हणून आम्ही वारंवार शासनाला निवेदन देऊन नवीन मोबाइलची मागणी केलेली आहे. म्हणूनच आज आम्ही मोबाइल वापसी आंदोलन केले आहे. मोबाइलमुळे काम थांबणार असल्याने नवीन मोबाइल लवकर द्यावेत.

- स्वाती शेट्ये, अध्यक्ष, अंगणवाडी कर्मचारी सभा, लांजा