शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
2
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
3
Top Marathi News LIVE Updates:राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक
4
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
5
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
6
धक्कादायक! घरातच बलात्कार करुन मोबाईल चार्जरने गळा आवळला; दिल्लीत IRS अधिकाऱ्याच्या मुलीसोबत अमानवीय कृत्य
7
लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल
8
Jara Hatke: बिस्किट चहात बुडवून खायचं हे ठरवलं कुणी? कशी होती बिस्किटांची मूळ चव? माहितीय?
9
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
10
पेट्रोल-डिझेल विसरा, आता १००% इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या; नितिन गडकरी नेमकं काय म्हणाले?
11
विजय केडियांनी खरेदी केले 'या' कंपनीचे ४४ लाख शेअर्स, स्टॉकला लागलं अपर सर्किट; ५ वर्षांत २१००% चा रिटर्न
12
"जिंकाच, अन्यथा पर्याय नाही.."; एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची सत्तेची ‘पॉवर ब्लूप्रिंट’ तयार
13
अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू
14
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
15
गुरुवारी गुरुपुष्यामृत योग: आवर्जून स्वामी सेवा करा; मनातील इच्छापूर्ती, अशुभता दूर होईल!
16
डोळ्यांवर पट्टी, हात-पाय बांधले... वेस्टर्न स्टाईल प्रपोजच्या बहाण्याने बॉयफ्रेंडला जिवंत जाळलं
17
कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक
18
भाजप महिला आरक्षणाची सिरियल किलर, सामान्य महिलेने दाखवला खरा आक्रोश, वडेट्टीवार यांचा टोला
19
इराणला मिळाले नवे 'अण्वस्त्र'; अमेरिकेचीही पंचाईत, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून ताबा घेण्याचा प्रयत्न
20
न्यूड व्हिडीओ कॉलसाठी २० हजार दे; अभिनेत्रीचे विद्यार्थ्यासोबतचे अश्लील चॅट व्हायरल, सोशल मीडियावर खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

मिरजोळे-मधलीवाडीत भूस्खलन धोका वाढला

By admin | Updated: July 16, 2015 00:30 IST

शेतकरी चिंताग्रस्त : भेगांमधील दरी रुंदावली

रत्नागिरी : मिरजोळे (ता. रत्नागिरी) येथे नदीने पात्र बदलल्याने गेल्या १५ वर्षांपासून भूस्खलनाचे प्रमाण वाढले आहे. मात्र, याबाबत अजून कोणतीच उपाययोजना करण्यात आलेली नाही. हे भूस्खलनाचे प्रमाण असेच वाढत राहिल्यास गावातील विविध वाड्यांच्या शेतीला तसेच वाडकरवाडीतील घरांना धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.मिरजोळे - मधलीवाडी येथे १५ वर्षांपासून नदीने पात्र बदलले आहे. त्यामुळे पावसाळ्यात दरवर्षी भूस्खलन होते. याबाबत येथील ग्रामस्थांनी तत्कालीन जिल्हाधिकारी राजीव जाधव यांच्याकडे माहिती दिली असता, त्यांनी स्वत: याबाबत पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिली होती. या घटनेला आता वर्ष उलटून गेले तरीही यावरील उपाययोजनेकडे दुर्लक्ष केले गेले आहे. त्यानंतरही पुन्हा जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्याकडे निवेदन दिल्यानंतर त्यांच्या आदेशावरून पत्तन विभागाचे अधिकाऱ्यांनी या ठिकाणाची पाहणी केली. मात्र, त्यांनी काय कारवाई केली, ते अद्याप गुलदस्त्यात आहे. गेल्या पाच - सहा वर्षांपासून केवळ पाहणी दौऱ्याशिवाय काही झालेले नाही. मात्र, ग्रामस्थांच्या हिताच्या दृष्टीने अद्याप कुठलीच उपाययोजना ठोसपणे राबवलेली नाही, असे मिरजोळे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.मिरजोळे गावात दरवर्षी भूस्खलन होते. त्यामुळे या सर्व वाड्यांतील शेती वाया गेली असून, घरांनाही धोका निर्माण झाला आहे. याबाबत येथील ग्रामस्थ गुरूनाथ भाटवडेकर यांनी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्याकडे निवेदन दिले आहे. सध्या होत असलेली ही धूप फक्त पिचिंग करून थांबवता येण्यासारखी आहे. शेती तसेच घरांना भूस्खलनापासून असलेला धोका लक्षात घेऊन या भागात पिचिंग करण्याकरिता संबंधित विभागाला सूचना द्याव्यात, अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी)