शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
2
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
3
Top Marathi News LIVE Updates:राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक
4
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
5
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
6
धक्कादायक! घरातच बलात्कार करुन मोबाईल चार्जरने गळा आवळला; दिल्लीत IRS अधिकाऱ्याच्या मुलीसोबत अमानवीय कृत्य
7
लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल
8
Jara Hatke: बिस्किट चहात बुडवून खायचं हे ठरवलं कुणी? कशी होती बिस्किटांची मूळ चव? माहितीय?
9
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
10
पेट्रोल-डिझेल विसरा, आता १००% इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या; नितिन गडकरी नेमकं काय म्हणाले?
11
विजय केडियांनी खरेदी केले 'या' कंपनीचे ४४ लाख शेअर्स, स्टॉकला लागलं अपर सर्किट; ५ वर्षांत २१००% चा रिटर्न
12
"जिंकाच, अन्यथा पर्याय नाही.."; एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची सत्तेची ‘पॉवर ब्लूप्रिंट’ तयार
13
अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू
14
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
15
गुरुवारी गुरुपुष्यामृत योग: आवर्जून स्वामी सेवा करा; मनातील इच्छापूर्ती, अशुभता दूर होईल!
16
डोळ्यांवर पट्टी, हात-पाय बांधले... वेस्टर्न स्टाईल प्रपोजच्या बहाण्याने बॉयफ्रेंडला जिवंत जाळलं
17
कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक
18
भाजप महिला आरक्षणाची सिरियल किलर, सामान्य महिलेने दाखवला खरा आक्रोश, वडेट्टीवार यांचा टोला
19
इराणला मिळाले नवे 'अण्वस्त्र'; अमेरिकेचीही पंचाईत, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून ताबा घेण्याचा प्रयत्न
20
न्यूड व्हिडीओ कॉलसाठी २० हजार दे; अभिनेत्रीचे विद्यार्थ्यासोबतचे अश्लील चॅट व्हायरल, सोशल मीडियावर खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

महिपतगडाची वाट बिकट

By admin | Updated: September 5, 2015 23:54 IST

खेड तालुका : रस्त्यावर ५ कोटी ५० लाखांचा खर्च

खेड : शिवत्रपतींच्या पराक्रमाने स्मरणात राहिलेल्या खेड तालुक्यातील ंमहिपतगड या किल्ल्यावर जाण्यासाठी तयार करण्यात येत असलेल्या रस्त्याची दूरवस्था झाली आहे. ५ कोटी ५० लाख रूपये एवढा मोठा खर्च या रस्त्यावर होणार आहे़ मात्र, अद्याप निम्मे कामही पूर्ण झालेले नाही. शिवाय जे काम केले आहे़, ते निकृष्ट असल्याची ओरड ग्रामस्थांनी केली आहे. त्यामुळे स्वातंत्र्यानंतर डोंगरदऱ्यातून सुरू असलेली येथील धनगर समाजाच्या लोकांची पायपीट जैसे थे आहे़ महिपतगड येथील मौजे बेलदारवाडीतील ग्रामस्थांनी गेलीे दोन वर्षे आपली कैफियत राजकीय पुढाऱ्यांकडे मांडली आहे़ गतवर्षी रामदास कदम यांचेकडेही ग्रामस्थांनी आपली व्यथा मांडली आहे़. यावेळी ठेकेदार काहीही काम करीत नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिले होते़ महिपतगड येथील या रस्त्याचे काम गेली १२ वर्षे अपूर्ण आहे़ विशेष म्हणजे या कामाचे भूमिपूजन रामदास कदम यांचे हस्ते झाले आहे़ त्यांनीच या कामासाठी निधी उपलब्ध करून दिल्याचे स्मरण या ग्रामस्थांनी कदम यांना करून दिले होते़ या रस्त्याच्या पहिल्या दोन टप्प्यांचे काम पूर्ण झाले आहे़ तिसऱ्या टप्प्याचे कामासाठी रामदास कदम यांनीच निधी मंजूर केला होता़ हे काम पूर्णपणे निकृष्ट दर्जाचे झाले असून, नियमानुसार बाजूची गटारे बांधली नसल्याचे येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे. ठरावामधील २२०० मीटरचे रस्त्याचे काम अद्याप केलेले नाही़ या रस्त्यांमुळे वाडी बेलदार येथील धनगर वस्तीतील १०० ग्रामस्थांना ये-जा करणे आणखी कठीण होऊन बसले आहे.़ शिवाय या ठेकेदाराकडे कामगारांना मजुरी देण्याइतपत पैसे देखील नसल्याचे या ग्रामस्थांनी समोर आणले आहे़ त्यामुळे हे काम अर्धवट स्थितीत राहणार असल्याचे दिसत आहे. त्यावेळी रामदास कदम यांनीही या ठेकेदाराकडून हे काम काढून त्याला काळ्या यादीत टाकण्याची कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते़ हे काम अन्य ठेकेदाराला देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. मात्र, या ग्रामस्थांच्या मागणीकडे हेतूपुरस्सर दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप होत आहे़ याकामी आता पुरातत्व विभागाने पुढाकार घेऊन महिपतगडाच्या एकूणच कामाची पाहणी करावी, अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी)