शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

हाेऊन जाऊ द्या शुभमंगल सावधान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:20 IST

रत्नागिरी : काेराेना रुग्णसंख्या व मृत्यूदर वाढतच असल्याने जिल्हा अद्याप शासनाच्या निर्बंधांनुसार चाैथ्या टप्प्यात आहे. त्यामुळे चाैथ्या टप्प्यातील शासकीय ...

रत्नागिरी : काेराेना रुग्णसंख्या व मृत्यूदर वाढतच असल्याने जिल्हा अद्याप शासनाच्या निर्बंधांनुसार चाैथ्या टप्प्यात आहे. त्यामुळे चाैथ्या टप्प्यातील शासकीय निर्बंधांचे पालन करण्यात येत आहे. लग्नसोहळ्यासाठीही प्रशासनाने अवघ्या २५ व्यक्तींनाच परवानगी दिली असून, लग्न सोहळ्यात सहभागी होणाऱ्या मंडळींसह वधू-वरांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह असणे क्रमप्राप्त आहे. त्यामुळे कित्येक यजमानांनी लग्नसोहळे रद्द केले आहेत. दीपावलीनंतर विवाह सोहळा उरकण्याचा निर्णय घेतला आहे.

शुभमुहूर्त मोजकेच

जुलै महिन्यात चातुर्मास सुरू झाल्यानंतर लग्नाचे मुहूर्तही मोजकेच आहेत. दि. २२ रोजी सकाळी १०.४८ व दुपारी १२.०८ व १२.४५, दि. २५ रोजी सकाळी १०.३७ व ११.५६, दुपारी १२.४५, दि. २६ रोजी सकाळी ११.४४ व दुपारी १२.४५, दि. २९ रोजी सकाळी ११.४० व दुपारी १२.४५ वाजता गाैण विवाह मुहूर्त आहेत. मात्र साखरपुड्यासाठी दि.३, दि.११, दि.१३, दि.१६, दि.२२, दि.२५, दि.२६, दि.२८, दि.२९ जुलै रोजी मुहूर्त आहेत. एकूण पाच दिवसांत लग्नाचे अकराच मुहूर्त आहेत. शासकीय निर्बंध शिथिल होत नसल्याने काहींनी दीपावलीनंतर लग्नसोहळा उरकण्याचा निर्णय घेतला आहे.

या असतील अटी

लग्न सोहळ्यात सहभागी होण्यासाठी वधू व वरांकडील मिळून अवघ्या २५ जणांनाच सहभागी होण्याची परवानगी.

वधू-वरांसह, सहभागी होणाऱ्या सर्वांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह असणे गरजेचे आहे.

लग्न सोहळ्यात सहभागी सर्वांना सोशल डिस्टन्सिंगसह मास्क वापर सक्तीचा आहे. वाद्यवृंदासाठी मनाई केली आहे.

n लग्नसोहळ्यासाठी परवानगी देताना, तहसीलदार व प्रांताधिकारी यांच्याकडे अर्ज सादर करणे आवश्यक आहे.

n अर्ज सादर केल्यानंतर प्रशासनाकडून शासकीय निर्बंधांची माहिती देऊन त्याचे पालन करण्यासाठी सूचित केले जाते.

n लग्नसोहळ्यासाठी परवानगी देत असतानाच स्थानिक शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांकडे विवाह सोहळ्यावर लक्ष ठेवण्यासाठी सूचना करण्यात येते, विवाह सोहळा पार पडेपर्यत इन कॅमेरा लक्ष ठेवले जाते, नियमावलींचे उल्लंघन झाल्यास तातडीने कारवाई केली जाते.

n लग्नसोहळ्यासाठी वाद्यवृंद, लाऊडस्पिकर, डीजे, वरात काढण्यासाठी मनाई करण्यात आली आहे.

लग्नासाठी शासकीय अटी-शर्थीच अधिक आहेत. लग्नासाठी मोजक्या माणसांची अट असल्याने त्यासाठी सभागृहाचे भाडे भरणे परवडणारे नाही. मंदिरे बंद आहेत, शिवाय पावसाळा असल्याने दारात लग्न करणे अशक्य असल्याने दीपावलीनंतरच मुलाचे लग्न उरकण्याचा निर्णय घेतला आहे. कदाचित तोपर्यत निर्बंध शिथिल होण्याची शक्यता आहे.

- एस. आर. काळे,

वधूपिता, रत्नागिरी

कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे प्रशासनाकडून अद्याप निर्बंध शिथिल करण्यात आलेले नाहीत. निर्बंधात कसूर झाल्यास किंवा नियमांचे उल्लंघन झाल्यास शिक्षा भोगण्यापेक्षा मुलांचे लग्न तूर्तास रद्द केले आहे. भविष्यात शिथिलता जारी केल्यानंतर विवाह सोहळा उरकण्यात येईल. शेवटी हाैस एकदाच होते, त्यामुळे नंतरच नियोजन करता येईल.

- जे. डी. पावसे,

वरपिता, रत्नागिरी