शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना खर्चासाठी नेत्यांचे मानधन, कर्मचाऱ्यांचा पगार उसना घ्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:29 IST

देवरुख : राज्यात ६०,००० पेक्षा जास्त रुग्ण पॉझिटिव्ह येत असून, ३०० च्या आसपास रुग्णांचा मृत्यू होत आहे. आवश्यक असलेला ...

देवरुख : राज्यात ६०,००० पेक्षा जास्त रुग्ण पॉझिटिव्ह येत असून, ३०० च्या आसपास रुग्णांचा मृत्यू होत आहे. आवश्यक असलेला लॉकडाऊन करु नये म्हणून विरोध, आंदोलने करुन लॉकडाऊन हाणून पाडणे, बेधडकपणे सण साजरे करणे, मास्क न वापरणे सामाजिक अंतर न ठेवणे, या निष्काळजीपणाची जबर किंमत सर्वांनाच मोजावी लागणार आहे. वाढत असलेल्या कोरोना परिस्थितीमुळे सरकारी खर्च मोठ्या प्रमाणावर वाढला आहे व अजूनही वाढणार आहे. यावर उपाय म्हणून आपत्कालीन परिस्थितीत केंद्र व राज्य सरकारने सर्व नेत्यांचे महिन्याचे मानधन व सर्व कर्मचाऱ्यांचा एक महिन्याचा पगार उसना घ्यावा व व्याजासह दिवाळीत परत करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते युयुत्सू आर्ते यांनी केली आहे.

व्यापारी, शेतकरी, कामगार व हॉटेल व्यावसायिक यांनी वर्षभर अनेक कळा सोसल्या आहेत. कोरोना आपत्तीची तीव्रता लक्षात घेता राजकीय पुढारी व कर्मचारी एखाद्या महिन्याचे मानधन व पगार व्याजासह उशिरा मिळणार असेल तर निश्चित कर्तव्य म्हणून कळ सोसतील, असा विश्वास आर्ते यांनी व्यक्‍त केला आहे. प्रचंड प्रमाणावर होत असलेल्या खर्चासाठी तातडीने पैसे उपलब्ध करण्यासाठी अशा पद्धतीची उपाययोजना राबविण्यात यावी. यासाठी सर्वांनीच आग्रही मागणी करावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

व्यापारी, शेतकरी, कामगार व हॉटेल व्यावसायिक, संस्था, संघटना आपापल्या पद्धतीने कोरोना संकटाला सामोरे जात असताना नेते व कर्मचाऱ्यांनीही काही कालावधीसाठी थोडी कळ सोसून या संकटात एकमेकांना मदत करावी, अशी अपेक्षा आर्ते यांनी व्यक्‍त केली आहे.