शहरं
Join us  
Trending Stories
1
राजीनामा देण्यास ममतांचा नकार, निवडणूक निकाल जनतेचा कौल नसून कटकारस्थान
2
सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
3
लैंगिक गुन्ह्यांतील आरोपींना पॅरोल नाकारणारा नवा कायदा येणार; मुख्यमंत्र्यांचे विधि व न्याय विभागाला निर्देश
4
आता सिलिंग जमिनींसाठी १० वर्षांनंतर मोठा दिलासा; जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकार; मोठ्या प्रकरणांना हवी राज्याची मंजुरी
5
नसरापूर लैंगिक अत्याचार; नराधमाला ७ मेपर्यंत कोठडी, विशेष सरकारी वकील नेमणुकीसाठी प्रस्ताव
6
मंत्रालयात कामाच्या धकाधकीत सुरांचा जल्लोष; मधुर गाण्यांनी टळटळीत दुपार झाली संस्मरणीय
7
दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव
8
जहाजात अडकलेल्या ५० खलाशांची सुटका; पाळीव प्राण्यांपेक्षाही हीन वागणूक : उच्च न्यायालय
9
मार्कच्या घरी ‘ड्रग्ज’ डिलिव्हरी कोणी केली? क्रिप्टो करन्सीमध्येही झाला नशेचा व्यापार !
10
फ्लेमिंगो तलाव संवर्धनासाठी सिडकोला ‘डेडलाइन’; पाण्याचा प्रवाह रोखला; दोन महिन्यांत अहवाल सादर करा हरित लवादाचे आदेश
11
विमान प्रवाशाच्या बॅगेतील पॉवर बँकचा स्फोट; आग लागताच विमानात उडाली धावपळ, ५ जण जखमी
12
इराणशी युद्धविराम संपलेला नाही; अमेरिकेची स्पष्टोक्ती, हाेर्मुझच्या मार्गातून व्यापारी जहाजांची पाठवणी सुरू
13
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
14
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
15
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
16
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
17
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
18
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
19
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
20
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

लोटेत वायूगळती; नऊजणांना बाधा

By admin | Updated: May 17, 2015 01:32 IST

नऊ तरुणांना बाधा

आवाशी : खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील लिटमस आॅरगॅनिक प्रा. लि. या कंपनीत शुक्रवारी सायंकाळी वायूगळती होऊन शेजारी खेळणाऱ्या चाळकेवाडीतील नऊ तरुणांना बाधा झाली. ही घटना सायंकाळी सहा वाजता घडली. वसाहतीतील अ‍ॅक्मे रसायनाचे उत्पादन घेणारी लिटमस आॅरगॅनिक कंपनी मागील दहा ते बारा वर्षांपासून कार्यरत आहे. शुक्रवारी मधल्या पाळीत उत्पादनाचे काम सुरू असताना एफबीडीच्या ट्रायरचे तापमान वाढल्याने तो फाटला व वायू परिसरात सर्वत्र पसरला. यावेळी कंपनीत लॅब असिस्टंट जितेंद्र चव्हाण यासह अविनाश सकपाळ, किरण गांधी, अनंत कुंभार हे चारजण काम करीत होते. वायूगळती झाल्याने शेजारील मैदानावर क्रिकेट खेळणारे सुरत तटेकर, सौरभ चाळके, विनीत तावडे, निखिल तावडे, रवींद्र गजमल, अंकित इंगळे, नितीन कुळे, ओंकार चाळके, कल्पेश कुळे यांना श्वसनाचा त्रास जाणवू लागला. त्यांनी ग्रामस्थांसह तत्काळ महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला माहिती दिली. लागलीच मंडळाचे क्षेत्रीय अधिकारी व्ही. जी. भताणे व अभिजित कसबे यांनी कंपनीत भेट देऊन पाहणी करून पंचनामा केला. मात्र, कुणीही जबाबदार अधिकारी उपलब्ध नसल्याने त्यांनाही समर्पक उत्तरे व कारणे उपलब्ध होऊ शकली नाहीत. मात्र, तरीही संबंधित अधिकाऱ्यांनी यावेळी हा पंचनामा वरिष्ठांकडे सादर करून कंपनीवर कारणे दाखवा अथवा बंदची कारवाई होण्याचे संकेत दिले. यावेळी गावातील सचिन शिंदे, संभाजी कदम, रोहित चाळके, सुयोग चाळके, राजेंद्र शिंदे, संदीप चाळके, दिनेश चाळके, मीलन सुलेबावकर, प्रवीण सुलेबावकर, नितीन खरात, रवींद्र कुळे, रवींद्र गजमल, नारायण कुळे हे ग्रामस्थ उपस्थित होते. सुदैवाने कोणालाही रुग्णालयात नेण्याची वेळ आली नाही. (वार्ताहर)