शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

लॅण्डलाइन सेवा विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:32 IST

दापोली : तालुक्यातील केळशी परिसर तसेच उटंबर आडे, पाडले, लोणवडी आदी गावांमध्ये बीएसएनएलची लॅण्डलाइन सेवा बंद आहे. त्यामुळे ग्राहकांची ...

दापोली : तालुक्यातील केळशी परिसर तसेच उटंबर आडे, पाडले, लोणवडी आदी गावांमध्ये बीएसएनएलची लॅण्डलाइन सेवा बंद आहे. त्यामुळे ग्राहकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे. आठवडाभर ही सेवा बंद राहिल्याने इतर ठिकाणी संपर्क करणे अवघड होत आहे.

जैतापकर यांचा सत्कार

गुहागर : ओबीसी मोर्चा उत्तर रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष आणि निर्मलक्ष फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संतोष जैतापकर यांचा श्री पाणबुडी देवी कलामंचातर्फे विशेष सत्कार करण्यात आला. मुंबई येथे कलामंचाचे उपाध्यक्ष रमेश भेकरे आणि सचिव रमेश कोकमकर यांनी जैतापकर यांचा सत्कार केला.

रुग्णसंख्या वाढली

राजापूर : कोरोनाची रुग्णसंख्या तालुक्यात भरमसाठ वाढू लागली आहे. आतापर्यंत रुग्णसंख्या ५०० च्या जवळपास पोहोचली आहे. सुमारे ७० गावातील हे रुग्ण आहेत. सध्या वाढत्या संख्येने तालुकावासीयांमधून चिंता व्यक्त होऊ लागली आहे. नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन आरोग्य यंत्रणेने केले आहे.

रक्तदान शिबिर

रत्नागिरी : कोरोना रुग्णसंख्या वाढत असतानाच रक्ताचा तुटवडाही भासत आहे. जिल्हा रुग्णालयाला असलेल्या रक्ताची गरज लक्षात घेऊन युवक काँग्रेसतर्फे रक्तदान शिबिर आयोजित करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गतवर्षाप्रमाणे प्रशासनाच्या नियमांचे पालन करून हे रक्तदान शिबिर घ्यावे असे महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.

तारण योजना

रत्नागिरी : शेतकऱ्यांच्या मालाला योग्य हमीभाव मिळवून देण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे पीक तारण कर्ज योजना हाती घेण्यात आली आहे. या योजनेतून काजू बी व सुपारीला बाजारभावाच्या ७५ टक्के रक्कम, ६ टक्के व्याजदराने उपलब्ध होणार असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

ढगाळ वातावरण

देवरुख : सकाळी दाट धुके आणि त्यानंतर अचानक ढगाळ वातावरण, दुपारनंतर असह्य उकाडा अशा संमिश्र वातावरणाने तालुक्यातील नागरिक हैराण झाले आहेत. संगमेश्वर तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून असे वेगवेगळे वातावरण सुरू झाले आहे.

रस्त्याची धूप

राजापूर : तालुक्यातील धाऊलवल्ली येथे एसटी स्टॅण्डकडे जाणाऱ्या रस्त्यावर खाडीचे पाणी येत असल्याने या रस्त्याची मोठ्या प्रमाणावर धूप झाली आहे. रस्त्याची तटबंदी कोसळल्यामुळे हे खारे पाणी रस्त्यावर येत आहे. त्यामुळे खराब झालेला हा रस्ता आणि या ठिकाणी कोसळलेला धक्का यामुळे हा मार्ग धोकादायक झाला आहे.

दूषित पाणीपुरवठा

रत्नागिरी : शहरात गेले दोन दिवस पाणीपुरवठा झाला नव्हता. बुधवारी तिसऱ्या दिवशी जेमतेम अर्धा तास पाणी आले. मात्र विविध भागांमध्ये आलेले गढूळ पाण्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून नगरपरिषदेचा पाणीपुरवठा अनियमित झाला आहे.

खत पुरवठ्याची मागणी

रत्नागिरी : अवकाळीचा तडाखा आणि रोगराईमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. तोंडचा घास हिरावल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. अशा परिस्थितीतही खरिपाच्या हंगामाला सुरुवात झाली आहे. या हंगामासाठी आवश्यक असणारा खत पुरवठा वेळेवर व्हावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

नवोदय परीक्षा १६ मे रोजी

रत्नागिरी : जवाहर नवोदय विद्यालय इयत्ता सहावीची प्रवेश परीक्षा शनिवार १० एप्रिल रोजी आयोजित केली होती. ही प्रवेश परीक्षा कोरोना संसर्गामुळे आता १६ मे रोजी होणार आहे. या परीक्षेसाठी प्रवेश अर्ज भरलेल्या विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी बदलाची नोंद घ्यावी, असे या विद्यालयाच्या प्राचार्यांनी कळविले आहे.