क्रांतिवीर सामाजिक पुरस्कार शैला दाभोलकर यांना जाहीर

By Admin | Updated: January 30, 2015 23:13 IST2015-01-30T22:55:00+5:302015-01-30T23:13:49+5:30

सुभाष पाटील : १२ फेबु्रवारीला हणमंतवडियेत वितरण

Krantiveer Social Award to Shaila Dabholkar | क्रांतिवीर सामाजिक पुरस्कार शैला दाभोलकर यांना जाहीर

क्रांतिवीर सामाजिक पुरस्कार शैला दाभोलकर यांना जाहीर

विटा : खानापूर व कडेगाव तालुका साहित्य परिषद व क्रांतिवीर भगवानराव पाटील अकादमीच्यावतीने देण्यात येणारा ‘क्रांतिवीर भगवानराव (बप्पा) पाटील सामाजिक पुरस्कार’ अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या धडाडीच्या कार्यकर्त्या श्रीमती डॉ. शैला नरेंद्र दाभोलकर यांना जाहीर करण्यात आला असल्याची माहिती अ‍ॅड. सुभाष पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
शैला या डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या पत्नी असून, अंधश्रद्धा निर्मूलन समितीतील त्या परिवर्तनाच्या चळवळीतील अत्यंत महत्त्वाच्या व्यक्ती आहेत. सातारा येथील व्यसनमुक्ती केंद्रासह अन्य सामाजिक कार्यात त्यांनी हिरिरीने सहभाग घेतला आहे.
त्यांच्या विविध क्षेत्रांतील सामाजिक कार्याची दखल घेऊन श्रीमती डॉ. शैला दाभोलकर यांना यावर्षीचा क्रांतिवीर भगवानराव पाटील सामाजिक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. दि. १२ फेब्रुवारीला हणमंतवडिये (ता. कडेगाव) येथे ज्येष्ठ विधीज्ञ अ‍ॅड. असिम देसाई यांच्याहस्ते डॉ. शैला दाभोलकर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याचेही अ‍ॅड. सुभाष पाटील यांनी यावेळी सांगितले. (वार्ताहर)

Web Title: Krantiveer Social Award to Shaila Dabholkar