दूध उत्पादकांना चक्क विमानाची सफर

By Admin | Updated: November 18, 2015 00:14 IST2015-11-17T23:36:23+5:302015-11-18T00:14:40+5:30

पुणे-चेन्नई-हैदराबाद प्रवास : गोटखिंडीतील संत गाडगेबाबा दूध केंद्राचा उपक्रम

The journey of milk makers to the aircraft | दूध उत्पादकांना चक्क विमानाची सफर

दूध उत्पादकांना चक्क विमानाची सफर

गोटखिंडी : गोटखिंडी (ता. वाळवा) येथील संत गाडगेबाबा दूध संकलन केंद्राला जास्तीत जास्त दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादकांना विमानाचा प्रवास घडवून आणला आहे. यामध्ये म्हैस दुधात, तसेच गाय दुधात अशा १० दूध उत्पादक शेतकऱ्यांचा समावेश आहे. या प्रवास तिकिटाचे नुकतेच मान्यवरांच्याहस्ते वाटप करण्यात आले आहे. म्हैस व गाय या प्रकारात एकूण १० दूध उत्पादकांना पुणे-चेन्नई-हैदराबाद असा विमान प्रवासाचा लाभ दिला आहे. दि. १७ रोजी ते गोटखिंडी येथून पुणे-चेन्नई-हैदराबाद अशा प्रवासासाठी रवाना झाले. ते २१ तारखेला परत गोटखिंडीला रवाना होणार आहेत. या प्रवासासाठी बाबासाहेब पाटील, माणिक पाटील, शंकर पाटील, शुभम पाटील, आशा पाटील, सूर्यकांत पाटील, रवींद्र महाडिक, आकाशी पाटील, सुशांत महाजन, संजय चिखलकर यांचा समावेश आहे. या प्रवासाचे तिकीट व सर्व दूध उत्पादकांना ठेव, लाभांश व अर्धा कि लो तूप वाटप करण्यात आले.
अध्यक्ष लालासाहेब पाटील, मार्गदर्शक धनंजय थोरात, देवानंद गोटखिंडे, बाबासाहेब तिबिले, प्रकाश पाटील, विजय सावंत, संपत वारके, जयवंत पाटील, माणिक पाटील, राजेंद्र थोरात, नाना गुरव, बी. आय. पाटील, के. व्ही. भोईटे, कुमार पाटील यावेळी उपस्थित होते. सचिव शीतल पोतदार यांनी आभार मानले. (वार्ताहर)

Web Title: The journey of milk makers to the aircraft