शहरं
Join us  
Trending Stories
1
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
2
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
3
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
4
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
5
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
7
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
8
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
9
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
10
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
11
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
12
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
13
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
14
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
15
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
16
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
17
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
18
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
19
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
20
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाभरात भातलागवडीला जोशात सुरूवात

By admin | Updated: June 27, 2016 00:39 IST

समाधानकारक पाऊस : लावणीची कामे सुरु, आतापर्यंत ५२८.८२ मिलिमीटर पावसाची नोंद

रत्नागिरी : गेल्या चार दिवसांपासून पावसाने चांगलाच वेग धरला आहे. आतापर्यंत सरासरी ५२८.८२ मिलिमीटर पाऊस झाला असून, मुसळधार पावसामुळे भात लागवडीलाही सुरूवात झाली आहे. धरपाण्याच्या क्षेत्रावरील भातशेती प्राधान्याने लागवड करण्यात येत आहे.खरीप हंगामात ६९ हजार ४७९ हेक्टर क्षेत्रावर भात लागवड करण्यात येते. १० हजार ९८० हेक्टर क्षेत्रावर नागली, १४९६ हेक्टरवर कडधान्य, ६३४.७ हेक्टरवर गळीतधान्य, तर ४७७ हेक्टर क्षेत्रावर इतर तृणधान्ये मिळून एकूण ८३ हजार ६६.७ हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात येते. कृषी विभागातर्फे ७०२६ क्विंटल भातबियाण्याची मागणी करण्यात आली होती. कृषी विभागाकडे उपलब्ध ४,०१६ क्विंटल भातबियाणे शेतकऱ्यांना वितरीत करण्यात आले होते. गतवर्षी कमी पर्जन्यमानामुळे दुबार पेरणीचे संकट ओढवल्याने यावर्षी दोन हजार क्विंटल भात बियाणे अधिक मागवण्यात आले होते. खरीप हंगामसाठी १९ हजार मेट्रिक टन खताला मंजुरी मिळाली असून, गतवर्षी १७ हजार मेट्रिक टन खत जिल्ह्याला उपलब्ध झाले होते. त्याचे १०० टक्के वाटप करण्यात आल्याने यावर्षी दोन हजार मेट्रिक टन अतिरिक्त खताची मागणी करण्यात आली आहे. टप्प्याटप्प्याने खताचे वितरण सुरू आहे. भात पेरणी करून रोपांची लागवड केली जाते. नांगर व पॉवरटिलरच्या सहाय्याने नांगरणी सुरू आहे. पॉवर टिलरचे तासावर भाडे आकारण्यात येत असले तरी कमी वेळेत चांगल्या प्रकारे नांगरणी होते. पाण्याची कमरता भासणाऱ्या शेतात पावसाच्या पाण्यावर प्राधान्याने लागवड करण्यात येत आहे. पाऊस चांगला बरसत असल्याने लागवडीच्या कामालाही बऱ्यापैकी वेग आला आहे. वाढती मजुरी व नांगर, पॉवरटिलरचे भाडे परवडत नसल्यामुळे गावात गटाव्दारे सामूहिक शेती करण्यात येत आहे. त्यामुळे अन्य कामांसाठी मजुरांची कमतरता भासत आहे. शेतकऱ्यांना बियाणे उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यात ‘ग्राम बिजोत्पादन’ तयार केले जाणार आहे. ग्राम बिजोत्पादनासाठी जिल्ह्यातील ५०० हेक्टर क्षेत्रावर भातपेरणी करण्यासाठी तालुकानिहाय एक ते दोन गावातून ५० ते ६० हेक्टर क्षेत्राची निवड करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या उत्पादनवाढीसाठी बांधावरील लागवडीकरिता कृषी विभागातर्फे तुरीचे वितरण करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)