शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
3
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
4
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
5
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
6
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
7
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
8
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
9
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
10
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
11
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
12
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
13
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
14
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
15
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
16
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
17
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
18
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
19
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

जिजामाता उद्यानासाठी साडेसहा लाख

By admin | Updated: January 10, 2015 00:12 IST

हे उद्यान वृद्ध व मुलांसाठी खुले करण्याच्या दृष्टीने त्वरित उपाययोजना करावी,

चिपळूण : खेड येथील जिजामाता उद्यानामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा असून, या उद्यानाची दुरवस्था झाली आहे. याबाबत त्वरित उपाययोजना करावी अन्यथा उपोषण करण्यात येईल, असा इशारा रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया, खेडतर्फे देण्यात आला होता. याची दखल घेऊन या उद्यानासाठी साडेसहा लाख रुपयांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले असल्याची माहिती नगराध्यक्षा पूनम पाटणे यांनी दिली. जिजामाता उद्यानामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा असून, उद्यानामध्ये लहान मुलांची खेळण्याची सोय आहे. परंतु, या ठिकाणी गवत वाढले असून, खेळणीही नादुरुस्त झाली आहेत. या परिसरात अस्वच्छता आहे. या उद्यानाच्या पाठीमागे तलावही आहे. लोखंडी ग्रील्स पूर्णपणे तुटलेले आहे. एखादे लहान मुल खेळताना दुर्घटना घडू शकते. उद्यानाच्या सभोवती बांधण्यात आलेली भिंतही नादुरुस्त आहे. डॉ. आंबेडकरांचा पुतळा व गेटच्या सभोवती असणारे काँक्रीट उखडले आहे. याबाबत रिपब्लिकन पार्टी खेड तालुका अध्यक्ष शंकर तांबे, युवा अध्यक्ष रजनिकांत जाधव यांच्यासह शिष्टमंडळाने उद्यानाच्या दुरुस्तीबाबत नगराध्यक्षा पूनम पाटणे यांच्याकडे पत्रव्यवहार केला होता. १९ पर्यंत काम न झाल्यास नगर परिषद कार्यालयासमोर उपोषणाला बसू, असा इशाराही देण्यात आला होता. पंधरा दिवसांच्या मुदतीनंतर पुन्हा रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाच्या शिष्टमंडळाने नगराध्यक्ष पाटणे यांची भेट घेऊन उद्यानाबाबत काय झाले, याची विचारपूस केली. नगराध्यक्ष पाटणे यांनी या उद्यानासाठी साडेसहा लाख रुपयांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले असल्याचे सांगितले. या अंदाजपत्रकाला मंजूरी असून, लवकरच उद्यानाचे काम हाती घेतले जाईल, असे आश्वासन पाटणे यांनी दिले असल्याने १९ जानेवारी रोजी होणारे उपोषण तूर्त स्थगित करण्यात आले. (वार्ताहर)जिजामाता उद्यानाची तात्पुरती डागडुजी करुन हे उद्यान वृद्ध व मुलांसाठी खुले करण्याच्या दृष्टीने त्वरित उपाययोजना करावी, अशी मागणीही रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया, खेडतर्फे करण्यात आली आहे.