शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
3
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
4
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
5
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
6
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
7
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
8
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
9
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
10
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
12
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
13
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
14
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
15
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
16
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
17
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
18
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
19
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
20
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

‘जिद्द’च्या विद्यार्थ्यांनी केले कळसूबाई शिखर सर

By admin | Updated: October 21, 2016 01:02 IST

तीन वर्षे निरंतर शिक्षण : भारतातील पहिले विशेष विद्यार्थी

चिपळूण : विशेष विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासाचे ध्येय घेऊन गेली २० वर्षे तालुक्यात कार्यरत असणाऱ्या ‘जिद्द’ शाळेच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रातील सर्वात उंच कळसूबाई शिखर सर करुन महाराष्ट्रातील किंबहुना भारतातील पहिले विशेष विद्यार्थी बनण्याचा सन्मान मिळवला आहे. गेल्या वर्षीही ‘जिद्द’ शाळेने ‘पर्यावरण मित्र विप्रो अर्थियन २०१५ पुरस्कार’ मिळवून हा पुरस्कार मिळविणारी भारतातील पहिली शाळा बनण्याचा सन्मान मिळवला होता. या पुरस्काराचा एक भाग म्हणून विप्रोतर्फे शाळेत तीन वर्षे निरंतर शिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार होता. या निरंतर प्रशिक्षणांतर्गत पहिल्या टप्प्यात दि. १४ ते १६ या कालावधीत बायोकल्चरल कॅम्प घेण्यात आला होता. या कॅम्पचा भंडारदरा-सांदण व्हॅली व कळसूबाई ट्रेक तसेच या भागात राहणाऱ्या ठाकर व महादेव कोळी या आदिवासी लोकांची संस्कृती, राहणीमान याचा अभ्यास करणे, जैवविविधतेचा अभ्यास करणे, गरजांचा अभ्यास करणे हा उद्देश होता. यामध्ये जिद्द शाळेबरोबरच गोवा, पुणे व नगरमधील पुरस्कारप्राप्त शाळांचा समावेश होता. जिद्द शाळेतून अक्षय लिंगायत, तुषार बोराटे, अमोल मोरे व शिक्षक उमेश कुचेकर यांची या कॅम्पसाठी निवड झाली होती. यामध्ये जिद्दच्या विद्यार्थ्यांनी अन्य सर्वसाधारण विद्यार्थ्यांबरोबर आदिवासी लोकांची संस्कृती, राहणीमान, आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाची खोल अशी सांदण दरी, भंडारदरा धरण यांचा अभ्यास यात हिरीरीने भाग घेतला. तसेच समुद्रसपाटीपासून १६४६ मीटर उंचीवर असलेले महाराष्ट्रातील सर्वात उंच कळसूबाई शिखर हे कोणाच्याही मदतीशिवाय किंंबहुना नॉर्मल विद्यार्थ्यांना मदत करत सर करुन सर्वांचीच मने जिंकली. आदिवासी लोकांबरोबर ठाकर नृत्य करुन स्थानिक पिकांची माहिती घेत या विद्यार्थ्यांनी आपण खरंच विशेष आहोत हे दाखवून दिले. या बायोकल्चरल कॅम्पमधील पर्यावरण शिक्षण केंद्र, पुणेच्या प्रोग्रॅम आॅफिसर अ‍ॅनी ग्रेगरी यांनी या विद्यार्थ्यांचे कौतुक केले. (प्रतिनिधी) गेल्यावर्षी जिद्द शाळेला मिळाला होता ‘पर्यावरण मित्र विप्रो अर्थियन २०१५’ पुरस्कार. पुरस्कार मिळवणारी भारतातील ‘जिद्द’ ही पहिली शाळा. विप्रोतर्फे जिद्द शाळेत तीन वर्षे निरंतर शिक्षण कार्यक्रम. निरंतर प्रशिक्षणांतर्गत पहिल्या टप्प्यात बायोकल्चरल कॅम्प. आदिवासी लोकांबरोबर सादर केले ठाकर नृत्य. कळसूबाई शिखर विद्यार्थ्यांनी कोणाच्याही मदतीशिवाय केले सर.