शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
2
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
3
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
4
Stock Markets Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ४०० अंकांनी खाली, Pharma-IT शेअर्समध्ये मोठी विक्री
5
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
6
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
7
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
8
सीता नवमी २०२६: आयुष्यातील संकटांनी खचून गेलात? मग माता सीतेचा 'हा' एक गुण तुम्हाला उभारी देईल!
9
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
10
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
11
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
12
Pune Water Shortage: पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही; पाण्यासाठी दुपारपर्यंत पाहावी लागणार वाट
13
लव्ह अफेअरचा दुर्दैवी अंत! २ तास गर्लफ्रेंडच्या ३ भावांनी मिळून बेदम मारले; बॉयफ्रेंडचा मृत्यू
14
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
15
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
16
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
17
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
18
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
19
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
20
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

पावसाअभावी जिल्ह्यात लावणी खोळंबली

By admin | Updated: June 27, 2014 01:08 IST

पावसाने फिरवली पाठ : ९५ टक्के भात पेरणी पूर्ण, पुढची कामे मात्र रखडली

रत्नागिरी : जिल्ह्यातील ९५ टक्के भातपेरणी पूर्ण झाली आहे. मात्र पावसाच्या विलंबामुळे लावणीची कामे खोळंबली आहेत. जिल्ह्यात ७००० हेक्टर क्षेत्रावर भाताची, तर १३०८ हेक्टर क्षेत्रावर नागलीची पेरणी झाली आहे. येत्या चार - पाच दिवसांत पाऊस आला नाही, तर भातपिकाचे नुकसान होण्याची भीती जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाकडून व्यक्त करण्यात आली आहे. जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी रोहिणी नक्षत्राच्या मुहुर्तावर भातपेरणीला सुरूवात केली होती. जून महिना कोरडा गेल्याने शेतकरी पावसाकडे डोळे लावून बसला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून भाताला धोका निर्माण होईल, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, जिल्ह्यात अधूनमधून पडणारा पाऊस पेरणीला सध्या तरी पूरक असल्याने आता रोपे चांगली उगवली आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ७००० हेक्टर क्षेत्रात भातपेरणी करण्यात आली आहे. १३०८ हेक्टर क्षेत्रात नागलीची पेरणी करण्यात आली आहे. सध्या जिल्ह्यात नियमित नसला तरी सध्या अधूनमधून पडणाऱ्या पावसामुळे पेरणीच्या कामात कुठलीच अडचण आली नाही. भातरोपे चांगली उगवली आहेत. त्यामुळे सध्या अधूनमधून पडणाऱ्या या पावसामुळे या रोपांचीही चांगली वाढ झाली आहे. सध्या पावसाला अनुकूल असे वातावरण जिल्ह्यात दिसू लागले असून, ३० तारखेपर्यंत पाऊस अपेक्षित आहे. मात्र, अधिकच लांबला तर मात्र, रोपे सुकून जाण्याचा धोका निर्माण होण्याची शक्यता या कार्यालयाकडून व्यक्त करण्यात आली. राजापूर, लांजा, संगमेश्वर आदी तालुक्यातील काही ठिकाणी भातरोपांवर लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. तेथील शेतकऱ्यांनी केलेल्या मागणीनुसार या कार्यालयाकडून सायफरमेथ्रीन या कीटकनाशकाचा पुरवठा या क्षेत्रात करण्यात येत आहे, असेही सांगण्यात आले. संगमेश्वरमध्ये सर्वाधिक पेरणीचे काम झाले असून, त्या तुलनेने गुहागर आणि मंडणगडमध्ये पेरणीचे प्रमाण कमी आहे. (प्रतिनिधी)