शहरं
Join us  
Trending Stories
1
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
2
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
3
एका शेअरवर २४० रुपयांचा डिविडंड देणार 'ही' कंपनी; नफ्यात जोरदार वाढ झाल्यानंतर कंपनीची घोषणा, तुमच्याकडे आहे का?
4
रणरागिणी! ज्वेलरी शोरुममध्ये शिरलेल्या चोराला १८ वर्षांची मुलगी भिडली; धाडसाचा Video व्हायरल
5
आयपीएलच्या इतिहासातील 'लो-स्कोअरिंग' सामना कुठला? अवघ्या ४९ धावांवर ऑलआऊट झाला होता 'हा' संघ
6
घसरणीसह उघडला शेअर बाजार, 'या' स्टॉक्सनं रेड झोनमध्ये केली कामकाजाला सुरुवात
7
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
8
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
9
पंजाबमधील पतियाळा येथे रेल्वे रुळांवर स्फोट, एका इसमाचा सापडला मृतदेह
10
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
11
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
12
लूज शर्ट अन् प्रेग्नन्सी ग्लो! दुसऱ्यांदा आई होणाऱ्या दीपिका पादुकोणचा एअरपोर्ट लूक व्हायरल
13
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
14
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
15
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
16
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
17
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
18
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
19
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
20
जनगणनेबाबत शंकांची ही घ्या उत्तरे; वैयक्तिक माहिती ठेवली जाते गुप्त, चुकीची माहिती दिल्यास...
Daily Top 2Weekly Top 5

कचऱ्यामुळे वाढते प्रदूषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2015 00:02 IST

रुग्णालयाची बेपर्वाई : शेजारीच जाळला जातो वैद्यकीय कचरा

आवाशी : परशुराम रुग्णालय व आयुर्वेदिक महाविद्यालयातील कचरा शेजारीच असणाऱ्या लोटे येथील एका खड्ड्यात जाळला जातो. अनेक दिवसांपासून या घटनेमुळे प्रदूषणासह विविध समस्या निर्माण झाल्या आहेत.लोटे (ता. खेड) येथे गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे पुणे येथील परशुराम रुग्णालय व आयुर्वेदिक महाविद्यालय सुरु आहे. मात्र, येथे प्राथमिक उपचार करुन रुग्णांना अधिक उपचारासाठी चिपळूण, डेरवण वा कराड - कोल्हापूर येथे पाठवले जाते. असे असतानाही छोटे - मोठे उपचार इथे करणाऱ्या या रुग्णालयाची स्वच्छतेबाबतची बोंब आहे. ज्या रुग्णालयामध्ये रुग्णाला व नातेवाईकाला स्वच्छतेबरोबर आरोग्य जपण्याचे काम करणे गरजेचे आहे. त्याच रुग्णालयाचा विविध प्रकारचा कचरा शेजारीच एका खड्ड्यात जाळला जात असल्याने रुग्णालयासह परिसराचे आरोग्य धोक्यात आले आहे.लोटे औद्योगिक वसाहत परिसरातील वैद्यकीय सेवा देणाऱ्या रुग्णालयांचा कचरा इतरत्र टाकला जाऊ नये. त्याची योग्य विल्हेवाट लावली जावी म्हणून येथील रहिवासी व उद्योजक संघटनेचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पटवर्धन यांनी अशा कचऱ्यांवर प्रक्रिया करून त्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी काही वर्षांपूर्वी युनिट स्थापन केले आहे. त्यांची ‘डिस्पोजल व्हॅन’ही हा कचरा गोळा करण्यासाठी फिरत असते. असे असतानाही परशुराम रुग्णालयासारख्या नामांकित रुग्णालयाचा दुर्गंधीयुक्त कचरा त्यांच्याच आवारालगत जाळला जात असल्याने संताप व्यक्त होत आहे. हा कचरा जाळला जातो, त्यावेळी त्याठिकाणी धुरामुळे आणि दुर्गंधीमुळे श्वास घेणेही मुश्किल होऊन जाते. याकडे प्रदूषण नियंत्रण मंडळाने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)परशुराम रुग्णालय : विविध प्रकारचा कचरालॅबमध्ये तपासले जाणारे रक्त, लघवीच्या काचेच्या, प्लास्टिकच्या नळकांड्या, इंजेक्शनच्या सिरीज, सलाईनच्या बाटल्या याचबरोबर औषधांचे बॉक्स व गरोदरपणात तपासली जाणारी नमुन्यांची पट्टी व अन्य औषधयुक्त कचरा या खड्ड्यात दररोज जाळला जातो.लक्ष देणार का?प्रदूषण नियंत्रण मंडळाने या वाढत्या प्रदुषणाकडे वेळीच लक्ष देणे गरजेचे असल्याचे मत रुग्ण आणि नातेवाईकांकडून व्यक्त होत आहे.