चेन चोरणाऱ्यांच्या कोठडीत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:39 IST2021-09-16T04:39:08+5:302021-09-16T04:39:08+5:30

रत्नागिरी : भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेत चारजणांच्या गळ्यातील सोन्याच्या सुमारे अडीच लाख रुपयांच्या चेन लांबविणाऱ्या दोन संशयितांच्या पोलीस कोठडीत ...

Increase in the chain of chain thieves | चेन चोरणाऱ्यांच्या कोठडीत वाढ

चेन चोरणाऱ्यांच्या कोठडीत वाढ

रत्नागिरी : भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेत चारजणांच्या गळ्यातील सोन्याच्या सुमारे अडीच लाख रुपयांच्या चेन लांबविणाऱ्या दोन संशयितांच्या पोलीस कोठडीत न्यायालयाने पुन्हा दोन दिवसांची वाढ केली आहे.

दत्ता श्रीमंत जाधव व पर्शुराम मल्हारी गायकवाड (दोन्ही रा. बीड) अशी पोलीस कोठडी सुनावण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. कोठडीची मुदत संपल्यानंतर बुधवारी या दोघांना न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांच्या पोलीस कोठडीत न्यायालयाने पुन्हा दोन दिवसांची वाढ केली आहे.

या प्रकरणातील दत्ता ज्ञानेश्वर गुंजाळ (वय ३३), सागर आत्माराम कारके (२१), नितीन अंकुश गायकवाड (२४), रमेश शंकर जाधव (५५), बाळू तुळशीराम जाधव (२८, सर्व रा. बीड) हे अन्य संशयित आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक मनोज भोसले करीत आहेत.

Web Title: Increase in the chain of chain thieves