शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
4
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
5
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
6
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
7
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
8
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
9
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
10
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
11
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
12
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
13
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
14
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
15
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
16
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
17
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
18
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
19
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
20
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

खेडमध्ये निराधार योजनाच ‘निराधार’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2015 00:30 IST

लाभार्थीच नाहीत : योजनांच्या अंमलबजावणीसाठी पुढाकार घेण्याची गरज...

खेड : निराधार व्यक्तींना आधारभूत अर्थसहाय करणाऱ्या शासनाच्या विषेश योजना निराधारांना सहायभूत ठरत आहेत. निराधारांचे आणि विधवांचे जीवनमान उंचावे, याकरिता राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध योजना सध्या कार्यरत आहेत़ २०१४ - २०१५ या आर्थिक वर्षात राष्ट्रीय कुटुंबकल्याण योजनेने जिल्ह्यातील ७९३ कुटुंबांना न्याय मिळवून दिला. खेडमध्ये केवळ ६ लाभार्थी असून, सर्वाधिक ३० लाभार्थी संगमेश्वरमध्ये आहेत. जिल्हा कार्यालयाकडून तब्बल ६७६ कुटुंबांना या योजनेअंतर्गत अर्थिक मदत मिळवून देण्यात आली. ही आकडेवारी समाधाकारक नाही. याकरिता शासन व सामाजिक स्तरावर अधिक प्रयत्न होणे गरजेचे आहे.निराधार घटकांसाठी शासनाच्या संजय गांधी निराधार योेजना विभागाच्या वतीने मासिक लाभाच्या विषेश योजना राबविण्यात येतात. त्यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तिवेतन योजना या दोन राज्य सरकारच्या, तर इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्तिवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तिवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तिवेतन योजना आणि राष्ट्रीय कृटुंब लाभ योजना या केंद्र सरकारतर्फे राबविण्यात येतात. यापैकी राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेअंतर्गत कमावत्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला किंवा त्याच्या वारसाला २० हजार रूपये अर्थसहाय देण्यात येते. या ६ योजनांचा लाभ जिल्ह्यातील अनेक निराधारांना मिळत आहे़ प्रशासनाच्या विशेष प्रयत्नांमुळे २०१४ या आर्थिक वर्षात जिल्ह्यातील ७९३ निराधार कुटुंबांना या योजनेचा आधार मिळाला. या विविध योजनांच्या अंमलबजावणीसाठी चांगले प्रयत्न झाल्यास याचा लाभ सर्वसामान्याना होणार आहे. अर्थात यासाठी ग्रामीण स्तरावरून विषेश प्रयत्न होणे अपेक्षित आहे. (प्रतिनिधी)