शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
2
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
3
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
4
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
5
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
6
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
7
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
8
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
9
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
10
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
11
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
12
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
13
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
14
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
15
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
16
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
17
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
18
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
19
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
20
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
Daily Top 2Weekly Top 5

नियमभंगाचा दंड चुकवला तर सातबारावर बोजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 11:47 IST

corona virus Ratnagiri-कोरोना संसर्गाचे जिल्ह्यातील वाढते प्रमाण लक्षात घेता  नियमांचा भंग केल्याप्रकरणी झालेला दंड लोकांनी चुकवल्यास त्या रकमांचा बोजा त्यांच्या साताबारा उता-यावर चढवला जाईल, असा इशाराही तीन प्रशासकीय विभागांच्या वतीने देण्यात आला आहे.

ठळक मुद्देमंडणगडात प्रशासनाची नामी शक्कलनियमावलीचे पालन करण्याचे आवाहन, तहसील कार्यालयाल संयुक्त परिषद

मंडणगड : कोरोना संसर्गाचे जिल्ह्यातील वाढते प्रमाण लक्षात घेता  नियमांचा भंग केल्याप्रकरणी झालेला दंड लोकांनी चुकवल्यास त्या रकमांचा बोजा त्यांच्या साताबारा उता-यावर चढवला जाईल, असा इशाराही तीन प्रशासकीय विभागांच्या वतीने देण्यात आला आहे.

तालुकावासियांनी कोरोना आरोग्य नियमावली व सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन तहसीलदार नारायण वेंगुर्लेकर, पोलीस निरीक्षक सुशांत वराळे, बाणकोट सागरी पोलीस स्थानकाचे निरीक्षक उत्तम पिठे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रभाकर भावठणकर यांनी तालुकावासियांना केले आहे.तीन प्रशासकीय विभागांच्या वतीने भिंगळोली येथे तहसील कार्यालयात संयुक्त परिषदेत हे आवाहन करण्यात आले. ग्रामीण व शहरी भागांत मास्क वापरणे अनिवार्य करण्यात आले असून, विनामास्क फिरणाऱ्या लोकांना ५०० रुपये इतका दंड आकारण्यात येणार असल्याचे तहसीलदार वेंगुर्लेकर यांनी स्पष्ट केले.

तालुक्यात होणाऱ्या सांस्कृतिक, धार्मिक, सामाजिक कार्यक्रमांसाठी प्रांताधिकारी दापोली यांची पूर्वपरवानगी गरजेची असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. क्रिकेट, कबड्डी, खोखो या खेळांच्या सामान्यांच्या आयोजनावर कटाक्षाने लक्ष ठेवण्यात येणार असून, त्यासाठीही प्रांताधिकाऱ्यांची परवानगी गरजेची आहे. तसेच लग्नकार्यास पन्नासपेक्षा अधिक संख्येने लोक गोळा होणार असल्यास त्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असेही ते म्हणाले.आंबेत व वाल्मिकीनगर येथील फेरीबोटीवर कोरोना नियमावलीचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच विनामास्क फेरीबोट प्रवेश बंद ठेवण्यात आला आहे. ग्राम व वाडी कृती दल यांचे पुन्हा गठन करण्यात आले आहे. कोरोना नियमावलीचा भंग करणाऱ्या लोकांनी दंड चुकवल्यास त्यांच्या घराचे असेसमेंट अथवा सातबारावर त्या रकमेचा बोजा चढविण्यात येणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

यावेळी निवासी नायब तहसीलदार अभिजित राणे, पोलीस उपनिरीक्षक शहाजी पवार, सहायक पोलीस उपनिरीक्षक सय्यद, नगरपंचायत प्रशासकीय अधिकारी अभिजित राणे हजर होते. नंतर या अधिकाऱ्यांनी शहरात मास्क वाटले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याTahasildarतहसीलदारRatnagiriरत्नागिरी