शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
2
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
3
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
4
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
5
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
6
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
7
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
8
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
9
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
10
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
11
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
12
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
13
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
14
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
15
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
16
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
17
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
18
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
19
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
20
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णालयाचा निधी परत जाणार

By admin | Updated: July 8, 2014 00:18 IST

जागाच नाही : चिपळूण नगर परिषदेला ३0 लाखांवर सोडावे लागणार पाणी

उत्तमकुमार जाधव ल्ल चिपळूण , शासनस्तरावर आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीने विविध उपक्रम राबविले जात आहेत. चिपळूण शहरातील नागरिकांना आरोग्य विषयक चांगल्या सेवा सुविधा मिळाव्यात, यासाठी केंद्र शासनातर्फे नॅशनल अर्बन हेल्थ मिशनअंतर्गत प्राथमिक रुग्णालय इमारतीसाठी २० लाखांचा निधी मंजूर झाला आहे. मात्र, नगरपरिषद हद्दीत या दवाखान्यासाठी जागा उपलब्ध होत नसल्याने हा निधी परत जाण्याची शक्यता आहे. चिपळूण नगरपरिषद हद्दीत अंदाजे ५५ ते ६० हजारच्या आसपास लोकसंख्या आहे. शासनाच्या आरोग्य विभागातर्फे रुग्णांना चांगली सेवा मिळावी, यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. ग्रामीण भागातही प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून रुग्णांना आवश्यक ती सेवा देण्याचा प्रयत्न केला जात आहे. जीवनावश्यक वस्तूंबरोबरच आधुनिक युगातही आरोग्य सुविधा मिळणे गरजेचे बनले आहे. सध्याची स्थिती पाहता शासकीय रुग्णालयांची स्थिती नाजूक आहे. चिपळूण नगरपरिषद हद्दीत केवळ एकच दवाखाना आहे. या दवाखान्यातही गेली ५ वर्षे वैद्यकीय अधिकारी नव्हता. सत्ताधारी व विरोधक यांच्या पाठपुराव्यानंतर नगरपरिषद दवाखान्यात ६ महिन्यांपूर्वी कायमस्वरुपी वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉ. कोमल मिर्लेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या या दवाखान्यात रुग्णांची वर्दळही वाढली आहे. रुग्णांना अन्य अत्यावश्यक सुविधा मिळाव्यात, या दृष्टीकोनातून केंद्र शासनातर्फे नॅशनल अर्बन हेल्थ मिशनतर्फे शहरात नवीन दवाखाना इमारत बांधण्यासाठी २० लाखांचा निधी मंजूर झाला आहे. यासंदर्भात मुख्याधिकाऱ्यांकडे जागेचा प्रस्ताव पाठविण्याची सूचनाही करण्यात आली आहे. मात्र, शहरात गेले काही महिने जागेचा शोध सुरु असून, अद्याप जागा सापडली नसल्याने रुग्णालयासाठीचा हा निधी परत जाण्याची शक्यता आहे. सत्ताधारी व विरोधक यांनी पुढाकार घेऊन या नवीन दवाखान्यासाठी जागा उपलब्ध करुन दिल्यास शहरातील नागरिकांना आरोग्यसेवेसाठी खासगी रुग्णालयाचा आधार घ्यावा लागणार नाही. यादृष्टीने प्रयत्न होणे गरजेचे आहे. थोडक्यात सांगायचे तर जागा मिळाल्याखेरीज येथे नवीन हॉस्पिटल इमारत होणार नाही, हे उघड सत्य आहे.