शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
3
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
4
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
5
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
6
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
7
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
8
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
9
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
10
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
11
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
12
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
13
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
14
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
15
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
16
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
17
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
18
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
19
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

‘विंदा दर्शना’तून उलगडला कविवर्यांचा इतिहास

By admin | Updated: June 8, 2014 00:57 IST

काव्य, नाट्य, संगीत, नृत्य याद्वारे विं. दा. करंदीकर यांचा काव्यप्रवास प्रा. विजया पाटील व त्यांच्या कुटुंबीयांनी समस्त रत्नागिरीकरांसमोर उलगडला.

रत्नागिरी : काव्य, नाट्य, संगीत, नृत्य याद्वारे विं. दा. करंदीकर यांचा काव्यप्रवास प्रा. विजया पाटील व त्यांच्या कुटुंबीयांनी समस्त रत्नागिरीकरांसमोर उलगडला. गुंजन पाटील यांनी सादर केलेल्या गणेशवंदनेने कार्यक्रमाची सुरूवात झाली. नगर वाचनालयातर्फे आयोजित करण्यात आलेल्या काव्य, नृत्य, संगीत नाट्यस्पर्शी विं. दा. दर्शन कार्यक्रम प्रा. विजया पाटील, अनिरुद्ध पाटील, गुंजन पाटील, एम. पी. पाटील यांनी सादर केला. वाचनालयाचे अध्यक्ष अ‍ॅड. दीपक पटवर्धन यांनी प्रास्ताविक केले. ‘नमन कविवरा विस्मयकारा...’ ही नांदी पाटील कुटुंबीयांनी सादर केली. त्यानंतर त्यांनी विंदाची स्वप्नांची बाग बालकविता सादर केली. ‘तळ्यात होता बेडूक’, ‘एका माकडाने काढले दुकान’ तसेच बकासुराची आदी बालकविता सादर करण्यात आल्या. सूत्रधार, नटी, विदूषक व पारंपरिक व्यक्तिरेखांबरोबरच कविवर्यांबद्दल बोलणारा प्रवक्ता तसेच कवीमित्र, कवितांचा आस्वाद घेणारी रसिक, समीक्षक, त्यांच्या संसारी जीवनाबद्दल बोलणारी पत्नी, त्यांच्या काहिशा विक्षिप्त परंतु उदारवादी वडिलांबद्दल बोलणारा एक कोकणी भटजी आणि गाणारी व नाचणारी मुले आदी दहा ते बारा व्यक्तिरेखा सादर करून पाटील कुटुंबीयांनी विंदांच्या आठवणी जाग्या केल्या. एकदा काय झाले... पक्षी उडून गेले, म्हणून झाड उडून गेले’, ‘चाफ्याभोवती नाचा गं... पानावरचं वाचा गं...’ या कवितेबरोबर क्रांतिकारी कविता ‘जनतेच्या पोटात आग आहे...’ सादर करण्यात आली. हार्मोनियम साथ आशिष पाटील यांनी तर तबलासाथ अमोल जोशी यांनी दिली. (प्रतिनिधी)