शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

महामार्ग चौपदरीकरण ही दिशाभूल

By admin | Updated: October 1, 2014 01:06 IST

चिपळूण : मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण केले जाणार आहे.

चिपळूण : मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण केले जाणार आहे. मात्र, या कामाबाबतच्या प्रस्तावाला अद्याप केंद्र शासनाकडून मंजुरी मिळालेली नाही, असे असताना घाईगडबडीत पुलाच्या कामाचे उद्घाटन करण्यात आले, ही केवळ कोकणवासीय जनतेची दिशाभूल आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आज (मंगळवारी) येथे केला. शहरातील राधाताई लाड सभागृहात चिपळूण - संगमेश्वर विधानसभा मतदार संघातील कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी उमेदवार शेखर निकम, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष रमेश कदम, कामगारमंत्री भास्कर जाधव, नगराध्यक्ष सावित्री होमकळस, प्रदेश निरीक्षक बाबाजी जाधव, गुहागरचे माजी सभापती नंदू पवार, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष जयंद्रथ खताते, शहराध्यक्ष श्रीकृष्ण खेडेकर, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष मनीषा जाधव, दादा साळवी, माजी सभापती शौकत मुकादम, माजी नगराध्यक्ष हेमलता बुरटे, रिहाना बिजले, महिलाध्यक्ष चित्रा चव्हाण, नगरसेवक सुचय रेडीज, सभापती समीक्षा बागवे, माजी सभापती दीप्ती माटे, रमेश दळवी, अ‍ॅड. शांताराम बुरटे आदी उपस्थित होते.राजकारण म्हटलं की, वैचारिक बदल होतातच. कोकणात विविध योजना याव्यात, ही आपली भूमिका आहे. अलिकडेच रत्नागिरीनजीक राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाच्या कामाचे भूमिपूजन नितीन गडकरी, खासदार विनायक राऊत, अनंत गीते यांच्या उपस्थितीत झाले. या कामाला केंद्र शासनाकडून मंजुरी मिळालेली नाही. कामाबाबतची प्रसिद्ध झालेली निविदा संबंधितांनी दाखवावी, असा इशारा तटकरे यांनी दिला. (वार्ताहर)