शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
3
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
4
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
5
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
6
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
7
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
8
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
9
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
10
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
11
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
12
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
13
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
14
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
15
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
16
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
17
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
18
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
19
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

समुद्र किनाऱ्यावर हाय अलर्ट

By admin | Updated: August 4, 2015 23:44 IST

दापोली तालुका : किनाऱ्यावर आढळलेल्या बॅरलने खळबळ

दापोली : दापोली तालुक्यातील बुरोंडी ते आंजर्ले दरम्यानच्या समुद्रकिनाऱ्यावर केमिकलने भरलेले १३ संशयास्पद बॅरल आढळून आल्याने किनारपट्टीवरील गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सन १९९०च्या आठवणी ताज्या झाल्याने दुसऱ्या दिवशीही समुद्रात अशा प्रकारचे काही बॅरल असल्याचे मच्छीमारांनी कळवले आहे. किनाऱ्यावरुन ताब्यात घेण्यात आलेल्या बॅरलमधील द्रव्य तपासणीसाठी पुणे येथे पाठवण्यात आले असून, अहवालानंतर या घटनेचे गूढ उकलणार आहे.दापोली तालुक्यातील समुद्रकिनाऱ्याचा यापूर्वी स्मगलिंगसाठी वापर झाल्याचा पुरावा आहे. याच किनारपट्टीवर संशयास्पद जहाजसुद्धा येऊन गेले होते. अशा प्रकारच्या घटना या समुद्रकिनाऱ्यावर वारंवार घडू लागल्याने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बुरोंडी, लाडघर, कोळथरे, कर्दे, मुरुड, पाळंदे, हर्णै, आंजर्ले, केळशी, आडे, पाडले या समुद्रकिनाऱ्यावर वारंवार संशयास्पद वस्तू किनाऱ्याला लागत आहे. सोमवारी दापोली पोलिसांना १३ बॅरल सापडल्यानंतर आजसुद्धा समुद्रात काही बॅरल तरंगत असल्याचे पोलिसांना सांगण्यात आले. मंगळवारी दिवसभर दापोली पोलीस बॅरलचा शोध घेत आहेत.दापोलीत सापडलेल्या बॅरलमुळे खळबळ उडाली असून, कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आल्यास पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन दापोलीचे पोलीस निरीक्षक डॉ. नियल बेन यांनी केले आहे. समुद्र किनाऱ्यावरील शोधमोहिमेसाठी पोलीस उपनिरीक्षक शुभांगी म्हस्के, हर्णै, पोलीस उपनिरीक्षक सी. जी. कांबळे, बुरोंडी बीट अंमलदार बांगर, पोलीस उपनिरीक्षक पी. डी. कांबळे यांनी प्रयत्न केले. (प्रतिनिधी)पोलीस यंत्रणा सतर्क...जिल्ह्यात केवळ दापोली तालुक्यातील समुद्र किनारीच अशा बॅरल आढळून आल्या आहेत. या बॅरलमध्ये रसायन भरलेले होते. मात्र, ते कोणते, याचा शोध लागलेला नाही. अजूनही बॅरल किनारी येत असल्याचे मच्छिमारांचे म्हणणे आहे. या बॅरेलमध्ये नेमके कोणते रसायन आहे, याचा शोध प्रयोगशाळेतून आलेल्या अहवालानंतरच लागणार आहे. पोलिसांनी सतर्कतेचा उपाय म्हणून जिल्ह्यात हाय अलर्ट जाहीर केला आहे. पोलिसांना दक्ष राहण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.पोलीस यंत्रणा सतर्क...जिल्ह्यात केवळ दापोली तालुक्यातील समुद्र किनारीच अशा बॅरल आढळून आल्या आहेत. या बॅरलमध्ये रसायन भरलेले होते. मात्र, ते कोणते, याचा शोध लागलेला नाही. अजूनही बॅरल किनारी येत असल्याचे मच्छिमारांचे म्हणणे आहे. या बॅरेलमध्ये नेमके कोणते रसायन आहे, याचा शोध प्रयोगशाळेतून आलेल्या अहवालानंतरच लागणार आहे. पोलिसांनी सतर्कतेचा उपाय म्हणून जिल्ह्यात हाय अलर्ट जाहीर केला आहे. पोलिसांना दक्ष राहण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.