शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

शहरात, परिसरात नागरिक हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:21 IST

रत्नागिरी : शहर परिसरामध्ये खड्ड्यांचे प्रमाण जास्त असल्याने लोकांचे हाल सुरू आहेत. वाहनधारकांच्या पाठीचे दुखण्याने त्रस्त झाले आहेत. त्यामुळे ...

रत्नागिरी : शहर परिसरामध्ये खड्ड्यांचे प्रमाण जास्त असल्याने लोकांचे हाल सुरू आहेत. वाहनधारकांच्या पाठीचे दुखण्याने त्रस्त झाले आहेत. त्यामुळे नगर परिषदेला जाग कधी येणार, असा प्रश्न केला जात आहे. याकडे लोकप्रतिनिधीही दुर्लक्ष करीत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

कोरोनाचा संसर्ग वाढतोय

रत्नागिरी : तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी कधी होणार, या चिंतेने लोकांना ग्रासले आहेत. तालुक्यात सर्वात जास्त कोरोना रुग्ण असून रुग्णांचे मृत्यूचे प्रमाणही अधिक आहे. त्यामुळे वाढत्या संसर्गाची कारणे शोधण्याची वेळ आली आहे. लॉकडाऊनमुळे कोरोनाचे रुग्ण कमी होतील, ही अपेक्षा फाेल ठरली आहे.

नुकसानग्रस्त भागाचा पंचनामा

गुहागर : मुसळधार पावसामुळे तालुक्यातील आठ घरांचे अंशत: नुकसान झाले आहे. नुकसानाची किंमत १ लाख ३९ हजार ५० रुपये असून, तलाठी आणि ग्रामसेवकांनी सर्व घरांचा पंचनामा केला आहे. तालुक्यात अन्य ठिकाणीही नुकसान झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

जैववैद्यकीय कचऱ्याची समस्या

चिपळूण : कोरोनाबाधित रुग्णांसाठी आधार ठरणाऱ्या कामथे उपजिल्हा रुग्णालयात सध्या कोविड जैववैद्यकीय कचऱ्याची समस्या निर्माण झाली आहे. या कचऱ्याची विल्हेवाट कशी लावायची, असा प्रश्न रुग्णालय व्यवस्थापनासमोर उभा राहिला आहे.

हळद रोपांचे वाटप

दापोली : आमदार योगेश कदम यांच्या हस्ते दापोली तालुक्यातील देवांगमधील शेतकऱ्यांना हळद रोपांचे वाटप करण्यात आले. आमदार कदम यांनी कोकण कृषी विद्यापीठ, दापोली यांना हळद लागवडीबाबत शेतकऱ्यांमध्ये आवड निर्माण करण्याचे उद्देशाने गावागावात मार्गदर्शन शिबिरे आयोजित करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

खड्ड्यांमुळे वाहनधारकांकडून संताप

चिपळूण : तालुक्यातील पेढांबे येथील पुलावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. खोल खड्ड्यात वाहने अडकल्याचे प्रकार घडत आहेत. मात्र, राष्ट्रीय महामार्ग उपविभागाकडून खड्डे बुजवण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले जात नाहीत. त्यामुळे प्रवाशांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

भातशेतीचे नुकसान

देवरूख : पाटबंधारे विभागाच्या मध्यम प्रकल्पांतर्गत कालव्याचे काम अपूर्णावस्थेत असल्याने माखजन पंचक्राेशीतील शेतकऱ्यांच्या भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कालव्याच्या बंदिस्त पाईपलाईनसाठी माखजन परिसरात खोदाई सुरू आहे.