शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

नातीची भेट ठरली अखेरची; विद्युत तारेच्या स्पर्शानं आजी आजोबांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2021 16:03 IST

आपल्या नातीची भेट घेऊन आजीआजोबा आपल्या घरी परतत असताना काळानं घातला घाला.

ठळक मुद्देआपल्या नातीची भेट घेऊन आजीआजोबा आपल्या घरी परतत असताना काळानं घातला घाला.वादळामुळे विद्युत वाहिन्यांचं झालं होतं नुकसान

रत्नागिरी : खेड तालुक्यातील लोटे येथून आपल्या लाडक्या नातीला भेटून परतत असताना विद्युत तारेच्या स्पर्शाने आजी-आजोबांचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी घडली. आपल्या नातीसह मुलांसमवेतची त्यांची ती भेट अखेरची ठरली.प्रकाश घोसाळकर आणि त्यांची पत्नी वंदना घोसाळकर बोरज गावातल्या आपल्या मूळ घरी राहत होते. बोरजपासून जवळच असलेल्या लोटे गावात त्यांचे दोन मुलगे, सुना आणि नातवंड असा परिवार आहे. लोटे गावात घोसाळकरांची छोटीशी एक चाळ आहे. तीन चार दिवसांपूर्वी त्यांची नात खेळताना पडून तिला दुखापत झाली होती. आपल्या नातीला भेटायला हे आजी-आजोबा आपल्या दुचाकीवरून लोटेला गेले होते. तिला भेटून तिची विचारपूस करुन ते बोरजला पोहोचले. पण घोसाळकरवाडीमधल्या आपल्या घरी जात असताना वाटेत ३३ केव्हीची विद्युत वाहिनी तुटून पडल्याचे लक्षात आले नाही आणि नकळत या तारेला त्यांचा स्पर्श झाला. प्रकाश आणि वंदना या पती पत्नीचा जागीच मृत्यू झाला. जवळपास असलेल्या काही ग्रामस्थांच्या ही दुर्दैवी घटना लक्षात आली. पण त्यांनी प्रसंगावधान राखत , संपर्कात येणाऱ्या अनेक अडथळ्यांवर मात करत महावितरणला कळवलं आणि वीज प्रवाह खंडीत करायला लावला. सोमवारी वाऱ्याचा जोर थोडा कमी झाल्यामुळे सायंकाळी दोघं नातीला भेटायला बाहेर पडले होते. या वादळाच्या वाऱ्यांचा जोर इतका होता की , अनेक ठिकाणी वीजेचे लोखंडी खांब मोडून पडले. महावितरण प्रशासनाने सर्व विद्युतप्रवाह खंडीत केला होता. पण वीज घेऊन येणाऱ्या अशा हायव्होल्टेज विद्युत तारांचा विद्युत भार मध्येच खंडीत करण्यात अनेक अडचणी येतात. त्यामुळे ही कोसळलेली तार विद्युतभारीतच राहिली. त्यातच घोसाळकरांवर काळाचा घाला घातला. 

टॅग्स :electricityवीजRatnagiriरत्नागिरीMaharashtraमहाराष्ट्रTauktae Cycloneतौत्के चक्रीवादळ