शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
3
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
4
Top Marathi News LIVE Updates:खरातच्या अकाउंटला बोगस खात्यांतून कोट्यवधी रुपये ट्रान्सफर
5
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
6
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
7
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
8
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
9
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
10
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
11
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
12
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
13
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
14
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
15
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
16
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
18
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
19
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
20
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
Daily Top 2Weekly Top 5

बारसू प्रकल्पग्रस्तांशी सरकारचा संवाद सुरू; तज्ञांची विशेष टीम बैठकीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2023 10:05 IST

जिल्हाधिकाऱ्यांनी केली स्थानिकांशी चर्चा

विनोद पवार

राजापूर (जि. रत्नागिरी) : बारसू रिफायनरीवरून राजकीय रणकंदन सुरू असतानाच आता सरकारने स्थानिकांशी संवाद साधण्यास सुरवात केली आहे. गुरुवारी जिल्हाधिकारी देवेंदर सिंग यानी राजापुरात प्रकल्प समर्थक आणि विरोधक अशी दोघांची संयुक्त बैठक घेऊन त्यांच्या भावना जाणून घेतल्या. प्रकल्प विरोधकांच्या शंकांचे निरसन व्हावे, यासाठी तज्ञांच्या उपस्थितीत ही बैठक सिंग यांनी आयोजित केली होती. दिल्ली, मुंबई येथील एक तज्ञांची विशेष टीम बैठकीला उपस्थित होती.

नाणारला प्रस्तावित रिफायनरी ६० एम. एम. टी. पी. ए. क्षमतेची होती. बारसू येथे २० एम. एम. टी.पी.ए. होणार आहे. त्यामुळे  बारसू आणि नाणार अशी ६० एम. एम. टी. पी. ए.  रिफायनरी उभारावी अशी मागणी  प्रकल्प समर्थक अविनाश महाजन यांनी केली. दरम्यान, बारसू येथे रिफायनरी प्रकल्पाला स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध असेल तर हा प्रकल्प पूर्वनियोजित जागी म्हणजे नाणार परिसरात व्हावा, अशी मागणी नाणार परिसरातील शेतकऱ्यांकडून पुढे येत आहे. परिसरातील शेतकऱ्यांनी यापूर्वीच शासनाकडे ८ हजार ५०० हजार एकर जमिनी प्रकल्पासाठी देण्याची संमतीपत्रेही सादर केली आहेत, ज्यांचा विरोध आहे, अशी गावे वगळून उर्वरित गावात हा प्रकल्प करावा, अशी अपेक्षाही स्थानिक शेतकऱ्यांनी केली आहे.  बारसूमध्ये प्रकल्प नेताना त्याचा आवाका कमी केला आहे. तो आधी ठरवलेल्या जागेतच करावा अशी मागणी आहे. 

कोकणचा कायापालट करणारा रिफायनरी प्रकल्प नाणार परिसरात व्हावा, यासाठी आम्ही २०१९च्या दरम्यान शासनाकडे आमच्या साडेआठ हजार एकर जमिनीची संमतीपत्रे सादर केलेली आहेत. आता जर बारसू परिसरात या प्रकल्पाला विरोध असेल तर शासनाने आमच्या साडेआठ हजार एकर जमिनी ताब्यात घ्यावात व रिफायनरी प्रकल्प मूळ नियाेजित परिसरातच करावा.  - प्रल्हाद तावडे, विलये दशक्रोशी रिफायनरी समर्थक समिती, शेतकरी व सदस्य.बारसू असेल वा नाणार; तो भाग वगळून देवगड व राजापूरचा भाग असेल तिथे हा प्रकल्प होणार असून तो  थांबविण्याची कुणात ताकद नाही.- नितेश राणे, आमदार

टॅग्स :GovernmentसरकारMumbaiमुंबईRatnagiriरत्नागिरीagitationआंदोलन