पुनस कडूवाडी शाळेचे सुवर्णमहोत्सवी वर्ष सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:37 IST2021-09-24T04:37:32+5:302021-09-24T04:37:32+5:30

लांजा : तालुक्यातील पुनस येथील जिल्हा परिषद केंद्र शाळा पुनस कडूवाडी या शाळेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाचा शुभारंभ जिल्हा परिषद सदस्य ...

Golden Jubilee Year of Punas Kaduwadi School begins | पुनस कडूवाडी शाळेचे सुवर्णमहोत्सवी वर्ष सुरू

पुनस कडूवाडी शाळेचे सुवर्णमहोत्सवी वर्ष सुरू

लांजा

: तालुक्यातील पुनस येथील जिल्हा परिषद केंद्र शाळा पुनस कडूवाडी या शाळेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाचा शुभारंभ जिल्हा परिषद सदस्य स्वरूपा साळवी यांच्या हस्ते शाळेच्या आवारातील बागेच्या कामाची पायाभरणी करून करण्यात आला.

पुनस कडूवाडी या शाळेचे यावर्षी सुवर्णमहोत्सवी वर्ष असून, या निमित्ताने शाळेचे माजी विद्यार्थी व ग्रामस्थांच्यावतीने संपूर्ण वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यापैकीच एक म्हणजे शाळेच्या आवारातील बाग कामाचे काम हाती घेण्यात आले असून, त्याचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी झालेल्या एका छोटेखानी कार्यक्रमाच्या व्यासपीठावर जिल्हा परिषद सदस्य स्वरूपा साळवी यांच्यासह पुनसचे सरपंच इलियाज बंदरी, शाळेचा अमृतमहोत्सवी वर्ष समितीचे अध्यक्ष संतोष साळवी, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष शर्वरी वाघाटे, ग्रामपंचायत सदस्य निकेश कडू, मुख्याध्यापिका थोरात उपस्थित होत्या. याप्रसंगी सुरेश साळवी, सखाराम धावडे, दत्ताराम गुरव, गणेश धुमाळे, संतोष यादव, भास्कर यादव, सुनील यादव, सुरेश गावडे, काशिनाथ कांबळे, खुदबुद्दीन काजी, गणपत माटल, दिलीप सावंत, संदीप सावंत, संतोष लिंगायत, राजाराम माटल, मुन्ना शेख, रामचंद्र कांबळे, दशरथ रसाळ, दत्तराज यादव, जयेंद्र रसाळ, सीताराम रहाटे, धरमू लांजेकर, माटल, किशोर कांबळे, अमोल लाखण, संतोष तथा राजू साळवी, प्रफुल्ल कांबळे, सुरेश कांबळे आदींसह महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

Web Title: Golden Jubilee Year of Punas Kaduwadi School begins