राजापुरात गोवा बनावटीची दारू जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:20 IST2021-07-03T04:20:53+5:302021-07-03T04:20:53+5:30

राजापूर : तालुक्यातील पन्हळे तर्फ सौंदळ मोरेवाडी येथे गोवा बनावटीची दारू विक्री करणाऱ्या प्रशांत दत्ताराम सरफरे याच्यावर छापा टाकून ...

Goa-made liquor seized in Rajapur | राजापुरात गोवा बनावटीची दारू जप्त

राजापुरात गोवा बनावटीची दारू जप्त

राजापूर : तालुक्यातील पन्हळे तर्फ सौंदळ मोरेवाडी येथे गोवा बनावटीची दारू विक्री करणाऱ्या प्रशांत दत्ताराम सरफरे याच्यावर छापा टाकून स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग रत्नागिरीच्या भरारी पथकाने १ हजार ३१९ रुपयांची गोवा बनावटीची दारू जप्त केली आहे. गुरुवारी सायंकाळी ६.४५ वाजता ही कारवाई करण्यात आली आहे. ही माहिती राजापूर पोलिसांनी पत्रकारांना दिली आहे.

याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस नाईक अमोल भोसले यांनी राजापूर पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे.

पन्हळे तर्फ सौंदळ मोरेवाडी येथे गोवा बनावटीची दारू विक्री होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हा अन्वेशन विभागाला मिळाली होती. या ठिकाणी प्रशांत दत्ताराम सरफरे हा गोवा बनावटीची दारू विक्री करत असल्याची माहिती पुढे आली होती. स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने गुरुवारी सायंकाळी धाड टाकून ही कारवाई करत सरफरे याच्याकडील १३१९ रुपयांची गोवा बनावटीची दारू जप्त केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दारूबंदी कायद्यान्वये सरफरे याच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास पोलीस हेडकाॅन्स्टेबल जाधव करत आहेत.

Web Title: Goa-made liquor seized in Rajapur