शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! भाजपने मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्...
2
तामिळनाडूत विजय होणार मुख्यमंत्री; काँग्रेसची पाठिंबा देण्याची तयारी, पण त्याबदल्यात काय हवं?
3
पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या भारतीय ७ खलाशांची केली मदत
4
राजीनामा देण्यास ममतांचा नकार, निवडणूक निकाल जनतेचा कौल नसून कटकारस्थान
5
आजचे राशीभविष्य ६ मे २०२६: आर्थिक गुंतवणुकीसाठी अनुकूल दिवस, धनलाभ होण्याची शक्यता
6
सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
7
निश्चय केलेल्या 'विजय'चा विजय! प्रस्थापित गडांना खिंडार पाडणारा 'थलपती'चा झंझावात
8
लैंगिक गुन्ह्यांतील आरोपींना पॅरोल नाकारणारा नवा कायदा येणार; मुख्यमंत्र्यांचे विधि व न्याय विभागाला निर्देश
9
आता सिलिंग जमिनींसाठी १० वर्षांनंतर मोठा दिलासा; जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकार; मोठ्या प्रकरणांना हवी राज्याची मंजुरी
10
नसरापूर लैंगिक अत्याचार; नराधमाला ७ मेपर्यंत कोठडी, विशेष सरकारी वकील नेमणुकीसाठी प्रस्ताव
11
हे भोंदू बुवा आणि बाबा इतके का आणि कसे बोकाळले?
12
मंत्रालयात कामाच्या धकाधकीत सुरांचा जल्लोष; मधुर गाण्यांनी टळटळीत दुपार झाली संस्मरणीय
13
दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव
14
भोंदूबाबा अशोक खरातला ५ दिवसांची पोलिस कोठडी; शिर्डी जमीन गैरव्यवहार : राहाता न्यायालयाचे आदेश
15
जहाजात अडकलेल्या ५० खलाशांची सुटका; पाळीव प्राण्यांपेक्षाही हीन वागणूक : उच्च न्यायालय
16
मार्कच्या घरी ‘ड्रग्ज’ डिलिव्हरी कोणी केली? क्रिप्टो करन्सीमध्येही झाला नशेचा व्यापार !
17
फ्लेमिंगो तलाव संवर्धनासाठी सिडकोला ‘डेडलाइन’; पाण्याचा प्रवाह रोखला; दोन महिन्यांत अहवाल सादर करा हरित लवादाचे आदेश
18
विमान प्रवाशाच्या बॅगेतील पॉवर बँकचा स्फोट; आग लागताच विमानात उडाली धावपळ, ५ जण जखमी
19
इराणशी युद्धविराम संपलेला नाही; अमेरिकेची स्पष्टोक्ती, हाेर्मुझच्या मार्गातून व्यापारी जहाजांची पाठवणी सुरू
20
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
Daily Top 2Weekly Top 5

हापूसला ग्लोबल वॉर्मिंगचा फटका

By admin | Updated: May 26, 2015 00:56 IST

उष्णतेच्या लाटेमुळे होरपळतोय : आंबा बागायतदार मेटाकुटीस

संदीप बोडवे -मालवण -देशासह जागतिक बाजारपेठेत अब्जावधीचा व्यापार करणारा फळांचा राजा हापूस आंबा ग्लोबल वॉर्मिंगमुळे अस्मानी संकटात सापडला आहे. उष्णतेच्या लाटेमुळे उरला सुरला हापूस तग धरेनासा झाला आहे. प्रखर सूर्यकिरणांमुळे परिपक्व आंबा फळे झाडावरच होरपळून निघत आहेत. सुरुवातीला अवकाळी पाऊस आणि आता तापमान वाढ यामुळे येथील आंबा बागायतदार पुरता मेटाकुटीस आला आहे.गेल्या काही दिवसांपासून देशासह राज्यात आलेली उष्णतेची लाट आंबा पिकासाठी धोक्याची घंटा देणारी ठरली आहे. संपूर्ण राज्य होरपळून निघत असताना कोकणातील जगप्रसिद्ध हापूस आंब्यालाही तापमानवाढीचा चटका सहन करावा लागला आहे. येथील हापूस आंबा अतिशय संवेदनशील असल्याने तापमानातील बदल आंबा पिकावर परिणामकारक ठरत आहेत. अति थंडीबरोबरच अति उष्णताही आंबा पिकाला मानवेनासी झाली आहे.कोकणातील तापमानात मागील पाच-सहा वर्षांपासून सातत्याने वाढ नोंदली गेली आहे. यावर्षी याची तीव्रता अधिकच आहे. आठवडाभरापासून अचानक वाढलेली असह्य उष्णता आंबा पिकालाही सहन होईनाशी झाली आहे. डोंगराळ भागात व कातळावर असलेल्या आंबा बागांना याचा फटका अधिक प्रमाणात बसू लागला आहे. समुद्रसपाटीपासून उंचावर असलेल्या बागांमधील आंबा फळे प्रखर सूर्यकिरणांमुळे झाडावरच भाजून निघत आहेत. यामुळे बागायतदारांचे नुकसान होऊ लागले आहे.प्रखर सुर्यकिरणांचा फटकामागील चार पाच वर्षांपासून कोकणात सामान्य तापमानामध्ये तीन ते चार डिग्रीने वाढ झाली आहे. यावर्षी येथील तापमान ३७ अंशांच्याही पुढे गेले आहे. हापूस आंब्याची साल पातळ असल्याने प्रखर सूर्यकिरणांमुळे आंब्याच्या ‘पिगमेंटेशन’मध्ये बदल होऊन ‘अ‍ॅन्थोसायनिन’ प्रोसेसमध्ये वाढ व्हायला सुरुवात होते. यामुळे आंबा फळ खराब व्हायला सुरुवात होते.- डॉ. भरत साळवी,सहयोगी संशोधन संचालक,प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्ला