शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

वन विभागातर्फे उद्यान निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:20 IST

चिपळूण : येथील वन विभाग, रत्नागिरी आणि मानद वन्यजीव रक्षक नीलेश बापट यांचे संयुक्त विद्यमाने देवरुख येथे परसदारी फुलपाखरु ...

चिपळूण : येथील वन विभाग, रत्नागिरी आणि मानद वन्यजीव रक्षक नीलेश बापट यांचे संयुक्त विद्यमाने देवरुख येथे परसदारी फुलपाखरु उद्यान ही संकल्पना अभ्यासक प्रतीक मोरे यांनी यशस्वी केली आहे. त्यांचे ५ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता ‘रत्नागिरी जिल्ह्यातील फुलपाखरांची जैवविविधता, संवर्धन आणि उद्यान निर्मिती’ या विषयावर वेबिनार आयोजित करण्यात आले आहे.

आशा सेविकांना यंत्राचे वाटप

खेड : खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे लोटे घाणेखुंट परिसरातील आशा सेविकांना व गरजू ग्रामस्थांना कोरोना संसर्गापासून बचाव करण्यासाठी वाफेच्या यंत्राचे वाटप करण्यात आले. या उपक्रमासाठी लागणारी ६८ वाफेची यंत्रे लोटे औद्यागिक वसाहतीत कार्यरत असलेल्या कृष्णा ॲन्टीऑक्सिडंट युनिट दोन या कारखान्याकडून सामाजिक बांधिलकी स्वरुपात देण्यात आली.

रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य

देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील माखजन - करजुवे रस्त्यावरील खड्ड्यांचे साम्राज्य पुन्हा वाढल्याने पादचाऱ्यांसह वाहनचालकांना जीव मुठीत धरुन प्रवास करावा लागत आहे. या महत्त्वाच्या रस्त्याची तत्काळ दुरुस्ती न केल्यास खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करु, असा इशारा मावळंगेचे शिवसेना शाखाप्रमुख बाबू मोरे यांनी दिला आहे.

अनधिकृत वाळू उत्खनन

देवरुख : महसूल यंत्रणेच्या आशिर्वादाने जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात संगमेश्वर तालुक्याच्या पेढांबे गावात सक्शन पंपाद्वारे अवैध वाळू उत्खनन सुरु आहे. आंगवली पंचक्रोशीतही अशाचप्रकारे उत्खनन सुरु असून, महसूल अधिकाऱ्यांनी फक्त बघ्याची भूमिका घेतली आहे.

नारळ रोपांचे वाटप

चिपळूण : तालुक्यातील कळंबस्ते निर्मल ग्रामपंचायत येथे कृषी दिनाचे औचित्य साधून ग्रामपंचायतीच्या परिसरामध्ये नारळ रोपांची लागवड करण्यात आली. तसेच फणस कलम रोपांचे शेतकरी कुटुंबांना प्रत्येकी एक रोप वाटण्याचा शुभारंभ करण्यात आला.

चारसुत्री भातलावणी प्रात्यक्षिक

देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील मौजे आंत्रवली गावात तालुका कृषी संजीवनी मोहिमेंतर्गत चारसुत्री पध्दतीने भात लावणी प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. शेतीशाळा वर्ग शेतकरी आत्माराम माईन यांच्या शेतात घेण्यात आला. यावेळी मंडल कृषी अधिकारी सुरडकर यांनी मार्गदर्शन केले.