शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
4
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
5
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
6
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
7
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
8
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
9
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
10
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
11
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
12
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
13
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
14
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
15
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
16
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
17
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
18
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
19
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
20
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

लघुसिंंचन प्रकल्पांना निधीची उपलब्धता

By admin | Updated: December 25, 2015 00:40 IST

राजन साळवींचे प्रयत्न : जलसंपदा, जलसंधारण मंत्र्यांचे सचिवांना आदेश

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह््यातील राजापूर, लांजा, रत्नागिरी व संगमेश्वर या चार तालुक्यातील निधीअभावी रखडलेल्या महत्वाच्या लघुसिंंचन प्रकल्पांना शासनाकडून निधी उपलब्ध करुन द्यावा, या आमदार राजन साळवींच्या मागणीला जलसंपदा व जलसंधारण मंत्री विजय शिवतारे यांनी मान्यता दिली आहे. याबाबतचे आदेश जलसंधारण सचिवांना देण्यात आले आहेत.जिल्ह््यात पिण्यासाठी तसेच शेतीकरिता वापरण्यात येणाऱ्या पाण्याचे नियोजन करण्यासाठी शासनाने तयार केलेल्या आराखड्यानुसार राजापूर, लांजा, रत्नागिरी व संगमेश्वर ह्या चार तालुक्यांतील प्रस्तावित लघुसिंंचन प्रकल्पांचा समावेश होता. राजापूर तालुक्यातील जांभवली, तुळसवडे, शिवणे, कोंडवाडी, लांजा तालुक्यातील कुडेवाडी, विवली शिरवली, कोलेवाडी, कोचरी, कुरुंग, कोंडगे, आरगाव, संगमेश्वर तालुक्यातील चोरवणे, वांझोळे, भोवडे (बार्इंगवाडी) भोवडे (तिथवली) तर रत्नागिरी तालुक्यातील खानू या लघुसिंंचन प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. परंतु, यातील काही प्रकल्पांना निविदा प्रक्रियेमुळे स्थगिती मिळाली आहे तर काही प्रकल्पांच्या कामांना प्रारंभ झाला होता. परंतु, निधीअभावी सदर कामे प्रलंबित राहिली आहेत. परिणामी प्रकल्पग्रस्त, ग्रामस्थ, प्रकल्पस्थळी काम करणारे मजूर, त्यांची कुटुंबे तसेच ठेकेदार अशा सर्वच घटकांची मोठी कुचंबणा झाली आहे. मजूर व त्यांच्या कुटुंबावरही यामुळे उपासमारीचे संकट उभे राहिले आहे.या चार तालुक्यांतील लघुसिंचन प्रकल्पांबाबत आमदार राजन साळवी यांनी नागपूर येथील चालू हिवाळी अधिवेशनादरम्यान विधिमंडळात लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. यावर जलसंपदा व जलसंधारण मंत्री नामदार विजय शिवतारे यांनी आमदार साळवींच्या लक्षवेधीला उत्तर देताना सांगितले की, महाराष्ट्र जलसंधारण महामंडळाद्वारे ही कामे चालू आहेत. सदरील महामंडळाला मुदतवाढ नसल्याने तसेच पुरेसा निधी उपलब्ध नसल्याने ही सर्व कामे ठप्प आहेत. परंतु, महाराष्ट्र जलसंधारण महामंडळाला मुदतवाढ देण्याबाबत राज्य शासन अनुकूल असून, या प्रकल्पांबरोबरच ठेकेदारांची देयके तसेच आवश्यक निधीसाठी शासन तरतूद करणार असल्याचे नामदार शिवतारे यांनी सांगितले.या रखडलेल्या लघुसिंंचन प्रकल्पांची कामे वेगाने मार्गी लागावीत यासाठी आमदार राजन साळवी यांनी नामदार विजय शिवतारे यांची पुन्हा भेट घेतली. या प्रकल्पांना शासनाकडून त्वरित निधी उपलब्ध करुन द्यावा व तातडीने ही कामे सुरू करावी, अशी विनंती केली. शिवतारे यांनी याबाबतचे आदेश राज्याचे जलसंधारण सचिव पी. के. देशमुख यांना जारी केले आहेत. (प्रतिनिधी)सर्व रखडलेल्या लघुसिंंचन प्रकल्पांचा राज्यस्तरीय योजनांमध्ये समावेश करावा, असे आदेश विजय शिवतारे यांनी राजन साळवींच्या निवेदनावर कार्यवाही करताना दिले असून, राजन साळवी यांनी प्रकल्पग्रस्त, ग्रामस्थ, प्रकल्पस्थळी काम करणारे मजूर, त्यांची कुटूंबे तसेच ठेकेदार आदी सर्व घटकांचा विचार करुन दाखवलेल्या कार्यतत्परतेमुळे या घटकांना आता तरी न्याय मिळेल, अशा आशा यामुळे निर्माण झाल्या आहेत.