शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus Lockdown : तब्बल ३५ वाहनचालकांचे परवाने निलंबित, दुचाकी केल्या जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2020 13:43 IST

विनाकारण रस्त्यावर वाहने घेऊन येणाऱ्या २५ वाहनधारकांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली आहे. या कारवाईत ३५ दुचाकी जप्त करण्यात आल्या असून, संबंधित वाहन चालकांचे वाहतूक परवानेही तीन महिन्यांसाठी निलंबित करण्यात आल्याची माहिती वाहतूकपोलीस निरीक्षक अनिल विभुते यांनी दिली.

ठळक मुद्देसंचारबंदी काळात पोलिसांकडून कारवाईविनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाईचा बडगा

रत्नागिरी : कोरोनाच्या प्रतिबंधासाठी जिल्ह्यात सर्वत्र संचारबंदी आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवेशिवाय कोणीही घराबाहेर पडू नये, घरातच थांबून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र, त्यानंतरही किरकोळ कारणासाठी वाहने घेऊन रस्त्यावर येणाऱ्यांचे प्रमाण कमी झालेले नाही. त्यामुळे पोलिसांनी आता अत्यंत कडक भूमिका घेतल आहे.

विनाकारण रस्त्यावर वाहने घेऊन येणाऱ्या २५ वाहनधारकांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली आहे. या कारवाईत ३५ दुचाकी जप्त करण्यात आल्या असून, संबंधित वाहन चालकांचे वाहतूक परवानेही तीन महिन्यांसाठी निलंबित करण्यात आल्याची माहिती वाहतूकपोलीस निरीक्षक अनिल विभुते यांनी दिली.राज्यात कोरोनाचा प्रकोप सातत्याने वाढताना दिसून येत आहे. कोरोनाने सर्वांचेच जगणे मुश्किल केले आहे. हे संकट थोपविण्यासाठी शासन व प्रशासन स्तरावर अनेक उपाययोजना राबवल्या जात आहेत. अनेक राजकीय, धार्मिककार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. नागरिकांना घरातच राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अनेक नागरिक प्रशासनाच्या सुचनांचे पालन करीत आहेत. मात्र, काहीजणांकडून नियमांचे उल्लंघन होत असल्याचे दिसून येत आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ३० मार्चपासून रत्नागिरी शहरात विनाकारण किवा अत्यंत क्षुल्लक कारणे देत रस्त्यावर वाहने घेऊन येणाऱ्यांवर कारवाई करून वाहतूक पोलिसांनी चांगलाच दणका दिला आहे. गेल्या १५ दिवसांच्या काळात पोलिसांनी रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या दुचाकी व चारचाकी तसेच तीनचाकी वाहनांवर दंडात्मक कारवाई केली आहे. त्याअंतर्गत ५ हजारपेक्षा अधिक वाहनांकडून २० लाखांपर्यंत दंड वसुली करण्यात आली आहे.

त्यानंतरही वाहतूक नियम मोडण्याचे प्रकार थांबले नाहीत. त्यामुळे रस्त्यावर विनाकारण येणाऱ्या वाहनांची हवा सोडणे, गांधीगिरी करून वाहनधारकांना हात जोडून विनंती करणे यांसारखे अनेक उपाय योजण्यात आले. त्यानंतर आता वाहनांना जॅमर बसविण्यात आले आहे.

विनाकारण रस्त्यावर येणारी वाहने दंड झाल्यानंतरही पुन्हा रस्त्यावर दिसू लागल्याने त्यांच्यावर अधिक कठोर कारवाईचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे. ही वाहनेच जप्त करून ठेवली तर पुन्हा रस्त्यावर येणार नाहीत, हे लक्षात घेऊन आता वाहनांवर जप्तीची कारवाई पोलिसांनी सुरू केली आहे. आतापर्यंत ३५ दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या असून, संबंधित वाहनचालकांचे वाहतुकीचे परवानेही तीन महिन्यांसाठी निलंबित करण्यात आले आहेत.दरम्यान शहरातील व परिसरातील बहुतांश लोक हे कोरोनाच्या प्रतिबंधासाठी प्रशासनाने जारी केलेल्या नियमांचे पालन करीत असल्याचेही दिसून येत आहे. मात्र, घरात थारा न होणारे व संचारबंदी काळात शहरातील मोकळ्या रस्त्यांची पाहणी करण्यात व पोलिसांना कसे चकविले, यामध्ये धन्यता मानणाऱ्यांवरच आता पोलिसांचे लक्ष आहे. संचारबंदी काळात नाहक फेरफटका मारणाऱ्या व पोलिसांचे काम वाढविणाऱ्या या बेजबाबदार लोकांवर कटाक्षाने लक्ष दिले जात असून, कारवाई सुरूच राहणार आहे. 

कोरोनाचा रुग्ण सापडल्यानंतर शिवखोल व राजिवडा परिसर सील करण्यात आला आहे. त्यामुळे रत्नागिरी शहरातील रस्त्यांवरील होणारी वाहतूक मोठ्या प्रमाणात थांबली आहे. शहरात अत्यंत कडक पोलीस बंदोबस्त असून, अत्यावश्यक सेवा वगळता अन्य कोणत्याही वाहनांना रस्त्यावर येण्यास परवानगी नाही. त्याचा चांगला परिणाम दिसून येत आहे.- अनिल विभुते, पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRatnagiriरत्नागिरी