रत्नागिरीत ब्राउन हेरॉईनसह चौघांना बेड्या, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची मोठी कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2026 12:21 IST2026-01-12T12:19:24+5:302026-01-12T12:21:00+5:30
‘मिशन फिनिक्स’ अंतर्गत राबवण्यात आलेल्या या मोहिमेत जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या परिसरातून ३० ग्रॅम वजनाचे ब्राउन हेरॉईन सदृश्य अमली पदार्थ जप्त करण्यात आला

रत्नागिरीत ब्राउन हेरॉईनसह चौघांना बेड्या, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची मोठी कारवाई
रत्नागिरी : शहरात अमली पदार्थ विरोधी मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मोठी कारवाई केली आहे. ‘मिशन फिनिक्स’ अंतर्गत राबवण्यात आलेल्या या मोहिमेत जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या परिसरातून ३० ग्रॅम वजनाचे ब्राउन हेरॉईन सदृश्य अमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत चाैघांना ताब्यात घेण्यात आले आहे.
पोलिस अधीक्षक नितीन बगाटे आणि अतिरिक्त पोलिस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी सायंकाळी शहर परिसरात गस्त घालत होते. यादरम्यान ही कारवाई करण्यात आली.
या कारवाईत ताहीर रफीक कोतवडेकर (वय ३०, रा. थिबा पॅलेस रोड, रत्नागिरी, रिझवान अश्रफ नावडे (रा. राजीवडा, रत्नागिरी, आकीब जिक्रिया वस्ता (रा. राजीवडा, रत्नागिरी) आणि रफत करीम फणसोपकर (रा. राजीवडा, रत्नागिरी) या चौघांना ताब्यात घेतले आहे.
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक नितीन ढेरे, श्रेणी पोलिस उपनिरीक्षक संदीप ओगले, हवालदार शांताराम झोरे, विजय आंबेकर, दीपराज पाटील, विवेक रसाळ, योगेश नार्वेकर आणि कॉन्स्टेबल अतुल कांबळे यांच्या पथकाने केली.