शहरं
Join us  
Trending Stories
1
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
2
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
3
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
4
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
5
पंजाबमधील पतियाळा येथे रेल्वे रुळांवर स्फोट, एका इसमाचा सापडला मृतदेह
6
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
7
लूज शर्ट अन् प्रेग्नन्सी ग्लो! दुसऱ्यांदा आई होणाऱ्या दीपिका पादुकोणचा एअरपोर्ट लूक व्हायरल
8
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
9
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
10
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
11
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
12
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
13
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
14
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
15
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
16
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
17
जनगणनेबाबत शंकांची ही घ्या उत्तरे; वैयक्तिक माहिती ठेवली जाते गुप्त, चुकीची माहिती दिल्यास...
18
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
19
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
20
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

हरपुडेवासियांच्या नशिबी पायपीट

By admin | Updated: October 9, 2015 21:18 IST

संगमेश्वर तालुका : स्वतंत्र बसफेरी सुरू करण्याची ग्रामस्थांची मागणी

मार्लेश्वर : संगमेश्वर तालुक्यातील हरपुडे गावात स्वतंत्र बसफेरी नसल्याने येथील शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी, ग्रामस्थांना यांना पायपीट करावी लागत आहे. हरपुडे गावासाठी स्वतंत्र बसफेरी सुरू करण्यात यावी अशी मागणी ग्रामपंचायतीच्या वतीने देवरूख आगार व्यवस्थापकांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.देवरूखपासून ५ किलोमीटर अंतरावर हरपुडे गाव वसलेले आहे. या गावातील विद्यार्थ्यांना शालेय, महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी देवरूखात यावे लागते. सुमारे १०० विद्यार्थी देवरूख महाविद्यालय, आंबव अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षणासाठी येतात. यामध्ये विद्यार्थिनींची संख्या सर्वाधिक ६५ आहे. ५ कि. मी. पैकी ३ कि. मी. अंतर हे निर्मनुष्य आहे.येथील ग्रामस्थही पोटाची खळगी भरण्यासाठी कामानिमित्त देवरूख येथेच येतात. बसफेरी नसल्याने नाईलाजास्तव पायपीट करण्याची वेळ विद्यार्थी, तसेच ग्रामस्थांवर येत आहे. देवरूख आगारातून सकाळी ७ वाजता सुटणारी देवरूख- कुंडी बसफेरी येताना हरपुडे मार्गे येते. ही गाडी हरपुडे येथे सकाळी ९.१० वाजण्याच्या सुमारास येते. ही गाडी कुंडी, बेलारी, तामनाळे, निगुरवाडी येथील प्रवासी, विद्यार्थ्यांनी खचाखच भरून येते.गाडी फुल्ल असल्याने ती हरपुडे येथे थांबतच नाही. या मार्गावर अन्य बसफेरी नाही. दोन दिवसांपूर्वी कोसळलेल्या परतीच्या पावसामध्ये हरपुडे शाळेच्या पुढील कॉजवे हा वाहून गेला आहे. यामुळे या मार्गावरील सुरू असलेली ही कुंडी बसफेरीही बंद आहे. नाईलाजाने विद्यार्थी, ग्रामस्थ यांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. यामुळे त्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो.विद्यार्थीवर्गाची परवड थांबण्यासाठी सरपंच विकास आकटे यांनी पुढाकार घेतला आहे. या गावासाठी स्वतंत्र बसफेरी सुरू करण्याचा ठराव ग्रामसभेत करण्यात आला आहे. सोमवार ते शुक्रवार सकाळी ९ वाजता, सायंकाळी ५ वाजता, शनिवारी सकाळी ६.४५ वाजता व दुपारी १२ वाजता अशा बसफेऱ्या देवरूख आगारातून सोडण्यात याव्यात अशी मागणी तमाम ग्रामस्थांची आहे. या मागणीचे निवेदन नुकतेच आगार व्यवस्थापक दिलीपकुमार साळवी यांच्याकडे सुपुर्द करण्यात आले आहे. यावर साळवी यांनी हरपुडे वासियांनी केलेली मागणी रास्त आहे. बसफेरी सुरू करण्याचा प्रस्ताव वरिष्ठस्तरावर पाठवण्यात आला असल्याचे साळवी यांनी सांगितले. (वार्ताहर)