शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

कचरा टाकणाऱ्यांवर फौजदारी

By admin | Updated: August 1, 2014 23:26 IST

राजापूर नगर परिषद : नव्या नगराध्यक्षांची घोषणा

राजापूर : राजापूर शहरातील सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा इशारा राजापूर नगरपरिषदेने दिला आहे. येत्या पंधरा दिवसांत शहरातील सर्व पथदीप सुरु करण्याची ग्वाही दिली आहे. शहरात फिरणाऱ्या मोकाट जनावरांचा लवकरच बंदोबस्त करण्यात येईल, अशी माहिती राजापूरच्या नगराध्यक्ष मुमताज काझी व उपनगराध्यक्ष रवींद्र बावधाकर यांनी पत्रकारांना दिली आहे.शहराच्या सर्वांगिण विकासाला प्राधान्य देताना शहरातील स्वच्छतेकडे विशेष लक्ष देण्यात येणार आहे. सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर आता कोणतीही पूर्वकल्पना न देता कारवाई करण्यात येणार आहे. अनेक ठिकाणी लावण्यात आलेले कचरा टाकण्याचे फलकही गायब झाल्यामुळे कोठेही पुन्हा तसे फलक लावण्यात येणार नाहीत. त्यामुळे आता नागरिकांनी स्वच्छतेच्या बाबतीत स्वत: दक्ष राहावे व नगरपरिषदेला सहकार्य करावे, असे आवाहनही यावेळी नगराध्यक्षांनी केले आहे.राजापूर शहरातील मुख्य रस्ते व विविध प्रभागातील बंद पथदीप येत्या १५ आॅगस्ट पूर्वी सुरु करण्यात येतील. यासाठी लागणारे सामान व मनुष्यबळ नगरपरिषदेकडे उपलब्ध असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. बाजारपेठेतील रस्त्यावर अतिक्रमण झाल्यामुळे रस्ताच गायब झाला आहे. त्यामुळे व्यापारी व नागरिकांनी आपली अतिक्रमणे लवकरात लवकर स्वत: हटवावीत, यासाठी नगरपरिषदेकडून त्यांना लेखी पत्र देण्यात आली आहेत. इतके करूनही अतिक्रमणे हटवण्यात न आल्यास नगररिषद प्रशासन ती काढून टाकेल, असा इशाराही यावेळी नगराध्यक्षांनी दिला. रस्त्यावरील झाडी तोडण्याचे कामही करण्यात येत आहे. शहराच्या अनेक भागात व नदीपात्रात कचरा टाकण्याचे प्रमाण अधिक आहे. आता नदीपात्रात व सार्वजनिक ठिकाणी कोणीही कचरा टाकू नये, अशा प्रकारे कचरा टाकणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्यात येईल. मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मोहीम हाती घेण्यात आली असून, त्याचा परिणाम पुढील आठवडाभरातच दिसून येईल. (प्रतिनिधी)मध्यंतरी राजापूर नगरपरिषदेने शहरात प्लास्टिक बंदी लागू केली होती. मात्र, आता सर्वत्र प्लाास्टीक पिशव्यांचा वापर होताना दिसून येत आहे. आटवडा बाजार व बाजारपेठेतही या प्लास्टिकच्या पिशव्या व्रिकीसाठी ठेवण्यात आल्याचे चित्र आहे. त्यामुळे प्लास्टिक पिशव्या वापरावरील बंदी शहरात खऱ्या अर्थाने कधी लागू होणार, असा प्रश्न शहरवासीयांमधून विचारण्यात येत आहे.