एक जूनपासून मासेमारी बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:30 IST2021-05-24T04:30:27+5:302021-05-24T04:30:27+5:30

रत्नागिरी : महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम, १९८१ अंतर्गत मासेमारी दि.१ जून पासून बंद ठेवण्यात येणार आहे. ...

Fishing off from June one | एक जूनपासून मासेमारी बंद

एक जूनपासून मासेमारी बंद

रत्नागिरी : महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम, १९८१ अंतर्गत मासेमारी दि.१ जून पासून बंद ठेवण्यात येणार आहे. मासेमारी बंदीचा कालावधी दि.१ जून ते ३१ जुलै (दोन्ही दिवस धरून ६१ दिवस) निश्चित करण्यात आला आहे.

मत्स्यव्यवसाय विभाग आयुक्तालयाच्या आदेशानुसार चालूवर्षी दि.१ जून ते ३१ जुलैपर्यंत सागरी जलधी क्षेत्रात (सागरी किनाऱ्यापासून १२ सागरी मैलांपर्यंत) यांत्रिक मासेमारी नौकांना पावसाळी मासेमारी बंदी लागू करण्यात आली आहे. मात्र, ही पावसाळी मासेमारी बंदी पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या बिगर यांत्रिकी नौकांना लागू नाही.

सागरी जलधी क्षेत्रात (सागरी किनाऱ्यापासून १२ सागरी मैलांपर्यंत) यांत्रिक मासेमारी नौका पावसाळी मासेमारी बंदी कालावधीत मासेमारी करताना आढळल्यास त्या मासेमारी नौकांवर महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम, १९८१ कलम १४ अन्वये कठोर कारवाई करण्यात येणार आहे. दि.१ जूनपूर्वी मासेमारीसाठी गेलेल्या नौकांना दि.१ जूननंतर कोणत्याही परिस्थितीत बंदरात मासे उतरविण्यास परवानगी असणार नाही व अशा नौका महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम, १९८१ अंतर्गत कारवाईस पात्र राहणार आहेत.

त्यामुळे सर्व मासेमारी नौका दि. ३१ मे पूर्वी बंदरात पोहोचतील याची दक्षता नौकामालकांनी घ्यावी. पावसाळी मासेमारी बंदी कालावधीत कोणतीही यांत्रिक मासेमारी नौका कोणत्याही कारणास्तव समुद्रात जाणार नाही, याची दक्षता घेण्याचे सूचित करण्यात आले आहे.

Web Title: Fishing off from June one