शहरं
Join us  
Trending Stories
1
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
2
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
3
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
4
"...तेव्हा हेच नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये चालले होते, मी त्यांना ठाकरेंच्या सांगण्यावरून रोखलं", राजन विचारेंचा धक्कादायक दावा
5
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
6
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
7
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
8
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
9
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
10
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
11
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
12
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
13
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
14
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
15
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
16
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
17
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
18
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
19
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
20
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!

राज्य नाट्य स्पर्धेत अवघड जागेचं दुखणं प्रथम,बसणी पंचक्रोशीचा षटकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2019 2:01 PM

महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचलनालय आयोजित ५९ व्या महाराष्ट्र राज्य हौशी नाट्य मराठी स्पर्धेत रत्नागिरी व मालवण केंद्रातून बसणी पंचक्रोशी ग्रंथालय संस्थेतर्फे सादर करण्यात आलेल्या अवघड जागेचं दुखणं या नाटकाने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले आहे.

ठळक मुद्देनेहरू युवा कला दर्शन नाट्यमंडळाचे एक्सपायरी डेट द्वितीय बाबा वर्दम थिएटर्सचे काळे बेट लालबत्ती तृतीय

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचलनालय आयोजित ५९ व्या महाराष्ट्र राज्य हौशी नाट्य मराठी स्पर्धेत रत्नागिरी व मालवण केंद्रातून बसणी पंचक्रोशी ग्रंथालय संस्थेतर्फे सादर करण्यात आलेल्या अवघड जागेचं दुखणं या नाटकाने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले आहे.

द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक नेहरु युवा कला दर्शन नाट्यमंडळ रत्नागिरी संस्थेतर्फे सादर करण्यात आलेल्या एक्सपायरी डेट या नाटकाला मिळाले. तृतीय क्रमांकाचे पारितोषिक कुडाळ येथील बाबा वर्दम थिएटर्सतर्फे सादर करण्यात आलेल्या ह्यकाळे बेट लालबत्तीह्ण या नाटकाला प्राप्त झाले आहे.बसणी पंचक्रोशीच्या अवघड जागेचं दुखणं व नेहरु युवा कला दर्शन नाट्यमंडळाने सादर केलेल्या एक्सपायरी डेट या दोन्ही नाटकाची निवड अंतिम फेरीसाठी करण्यात आली आहे. स्पर्धेमध्ये उत्कृष्ट दिग्दर्शनाचे प्रथम पारितोषिक ओंकार पाटील (अवघड जागेचं दुखणं), द्वितीय पारितोषिक गणेश राऊत (एक्सपायरी डेट) यांना जाहीर झाले आहे.

प्रकाश योजनेचे प्रथम पारितोषिक राजेश शिंदे (अवघड जागेचं दुखणं), द्वितीय पारितोषिक साईप्रसाद शिर्सेकर (या व्याकुळ संध्या समयी), नेपथ्याचे प्रथम पारितोषिक गजानन पांचाळ (एक्सपायरी डेट), द्वितीय पारितोषिक प्रवीण धुमक (या व्याकुळ संध्या समयी), रंगभूषेचे प्रथम पारितोषिक प्रदीप पेंडणेकर (अवघड जागेचं दुखणं), द्वितीय पारितोषिक नितीन मेस्त्री (सगळो गांव बोंबालता), उत्कृष्ट अभिनयाचे रौप्यपदक स्वानंद देसाई (अननोन फेस) व तृप्ती राऊत (चाहूल) यांना प्राप्त झाले आहे.अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्र ऋचा मुकादम (अवघड जागेचं दुखणं), अर्चना पेणकर (एक्सपायरी डेट), तनया आरोळकर (मी स्वामी या देवाचा), भावना रहाटे (आता उठवू सारे रान), पूजा जोशी (धुआँ), अनंत वैद्य (काळे बेट लाल बत्ती), सुशांत पवार (दि ग्रेट एक्सचेंज), शरद सावंत (चाहूल), जयप्रकाश पाखरे (एक्सपायरी डेट), योगेश हातखंबकर (फेरा) यांना जाहीर झाले आहे.बसणी पंचक्रोशी संस्थेतर्फे गेली पाच वर्षे सादर करण्यात आलेल्या नाटकाने प्राथमिक फेरीत अंतिम क्रमांक पटकविला आहे. प्यादी, मेन विदाऊट शॅडोज्, मन वैशाखी डोळे, श्रावणी कॅप्टन, कॅप्टन, कॉफीन या नाटकाने सलग पाच वर्षे अंतिम स्पर्धेतील प्रथम क्रमांक संपादन केला. यावर्षी देखील षटकार ठोकून अवघड जागेचं दुखणं प्रथम क्रमांक मिळविला आहे. अंतिम स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळविण्याचा प्रयत्न असून त्यासाठी जोरदार सराव करणार असल्याचे दिग्दर्शक ओंकार पाटील यांनी ह्यलोकमतशीह्ण बोलताना सांगितले. 

टॅग्स :cultureसांस्कृतिकRatnagiriरत्नागिरी