शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
2
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
3
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
4
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
5
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
6
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
7
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
8
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
9
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
10
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
11
Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
12
सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल
13
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
14
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
15
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
16
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
17
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
18
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
19
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
20
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
Daily Top 2Weekly Top 5

रिफायनरी’साठी तीन तालुक्यात जागापाहणी

By admin | Updated: October 20, 2016 01:04 IST

सारंग कोडोलकर : राज्य शासनाला लवकरच अहवाल रवाना होणार

 रत्नागिरी : बहुचर्चित पेट्रोकेमिकल रिफायनरी प्रकल्पासंदर्भात तवसाळ (ता. गुहागर), दापोली तसेच नाणार (ता. राजापूर) येथील जागांची जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांनी पाहणी केली असून, जागा निश्चितीसंदर्भात ंअंतिम निर्णय वरिष्ठस्तरावरून लवकरच घेतला जाणार असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी सारंग कोडोलकर यांनी सांगितले. इंडियन आॅईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम या तीन भारतीय कंपन्यांनी कोट्यवधी गुंतवणुकीचा हा पेट्रोकेमिकल प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला आहे. हा प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्यात होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही अनुकूल आहेत. त्यामुळे या प्रकल्पासाठी जागा निश्चित करण्याबाबतच्या सूचना औद्योगिक विकास महामंडळ आणि महसूल प्रशासनाला देण्यात आल्या होत्या. त्यानुसार रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यात हे सर्वेक्षण सुरू आहे. मात्र, केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते हा प्रकल्प आपल्या लोकसभा मतदारसंघातील तवसाळ येथे होण्यासाठी आग्रही असल्याने प्रकल्प होण्यासाठी ते विशेष प्रयत्नशील आहेत. या प्रकल्पासाठी विशाल जागा आवश्यक असल्याने काही दिवसांपूर्वी गुहागर येथील तवसाळ तसेच दापोली येथे चाचपणी करण्यात आली होती. मात्र, या प्रकल्पाला तवसाळ तसेच दापोलीतील ग्रामस्थांचा काही प्रमाणात विरोध आहे. जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांनी या भागांची पाहणी केली आहे. त्याचबरोबर काही दिवसांपूर्वी राजापूर तालुक्यातील नाणार येथील जागेचीही पाहणी केली आहे. आधीच्या दोन जागांच्या तुलनेत राजापूर येथील जागा रिफायनरी प्रकल्पासाठी अनुकूल असल्याचे त्यांच्या पाहणीत निदर्शनास आले आहे. जिल्हाधिकारी यांनी केलेल्या तीनही जागांच्या पाहणीअंती राजापूर येथील जागा रिफायनरी प्रकल्पासाठी योग्य असल्याचे निदर्शनास आले असले तरी खासदार गीते हा प्रकल्प तवसाळ येथे नेण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यामुळे हा प्रकल्प नेमका कुठे होणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांनी तीनही जागांची पाहाणी केली असून, यापैकी कुठली जागा निश्चित करायची, याबाबतचा अंतिम निर्णय लवकरच घेतला जाणार आहे. (प्रतिनिधी)