अपघाताप्रकरणी कारचालकाविराेधात गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:30 IST2021-05-14T04:30:53+5:302021-05-14T04:30:53+5:30

रत्नागिरी : कार आणि दुचाकीला धडक देत अपघात केल्याची घटना मंगळवारी (दि. ११) सकाळी १०.५३ वाजण्याचा सुमारास जे. के. ...

Filed a case against the driver in the accident case | अपघाताप्रकरणी कारचालकाविराेधात गुन्हा दाखल

अपघाताप्रकरणी कारचालकाविराेधात गुन्हा दाखल

रत्नागिरी : कार आणि दुचाकीला धडक देत अपघात केल्याची घटना मंगळवारी (दि. ११) सकाळी १०.५३ वाजण्याचा सुमारास जे. के. फाईल्स ते फिनोलेक्स कॉलेज जाणाऱ्या रस्त्यावर घडली. या प्रकरणी कारचालकाविरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विक्रांत जवाहर बांदिवडेकर (रा. नाचणे, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या कारचालकाचे नाव आहे. त्याच्याविरोधात अपघातातील जखमी दुचाकीस्वार मंदार रमेश पेठे (वय ४१, रा. रत्नागिरी) यांनी तक्रार दिली आहे. ते मंगळवारी सकाळी आपल्या ताब्यातील दुचाकीवरून एमआयडीसी येथील व्ही. आर. एल. कंपनीत कामाला जात होते. त्यावेळी त्या रस्त्यावर अमेझ आणि बलेनो कार यांच्यामध्ये धडक झाली़ त्यानंतर बलेनो कार रस्त्याच्या उजव्या बाजूला आल्याने तिची धडक पेठे यांच्या दुचाकीला बसली़ त्यामध्ये ते जखमी झाले. याबाबत बुधवारी (दि. १२) गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक पूजा चव्हाण तपास करीत आहेत.

Web Title: Filed a case against the driver in the accident case