पोस्टाच्या भरतीत दहावीचे बाेगस प्रमाणपत्र, रत्नागिरीत प्रकार उघडकीस 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 14:07 IST2025-11-26T14:07:04+5:302025-11-26T14:07:32+5:30

लातूर, नांदेडमधील दोघांवर गुन्हा दाखल; दाेघांची नियुक्ती रद्द

Fake 10th class certificate in post recruitment in Ratnagiri, Case registered against two people from Latur and Nanded | पोस्टाच्या भरतीत दहावीचे बाेगस प्रमाणपत्र, रत्नागिरीत प्रकार उघडकीस 

पोस्टाच्या भरतीत दहावीचे बाेगस प्रमाणपत्र, रत्नागिरीत प्रकार उघडकीस 

रत्नागिरी : पाेस्टाच्या भरतीत बाेगस प्रमाणपत्र बनवून ती खरी असल्याचे भासवून फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार रत्नागिरी मुख्य डाकघर कार्यालयात सन २०२३ मध्ये घडला असून, याप्रकरणी लातूरनांदेड येथील दाेघांवर शहर पाेलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत रत्नागिरी पाेस्ट कार्यालयातील सहायक डाकघर अधीक्षक ज्ञानेश श्रीपाद कुलकर्णी (वय ३८, रा. खारेघाट राेड, रत्नागिरी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अनंत माराेती शेळके (२२, रा. काेकणगा, लातूर) व लंकाेश नामदेव राठाेड (२५, रा. शिरढाेण, ता. कंधार, नांदेड) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार ३१ जुलै २०२३ ते २१ नाेव्हेंबर २०२३ या कालावधीत घडला आहे. संशयित दाेघांनी राष्ट्रीय मुक्त विद्यालय शिक्षण संस्था, नाेएडा यांचे बाेगस प्रमाणपत्र बनविली हाेती. या प्रमाणपत्रांचा वापर त्यांनी पाेस्टाच्या भरतीमध्ये केला हाेता.

मात्र, हा प्रकार निदर्शनास येताच सहायक डाकघर अधीक्षक ज्ञानेश कुलकर्णी यांनी बाेगस प्रमाणपत्रांद्वारे शासनाची दिशाभूल करून फसवणूक केल्याची फिर्याद दिली आहे. या फिर्यादीनंतर २४ नाेव्हेंबर २०२५ राेजी रत्नागिरी शहर पाेलिस स्थानकात भारतीय दंडविधान संहिता कायदा कलम ४६५, ४६८, ४७१ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

दहावीचे बाेगस प्रमाणपत्र

संपूर्ण महाराष्ट्रात दर सहा महिन्यांनी पाेस्टात शाखा डाकपाल, डाक वितरक, डाकसेवक या पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येते. ही संपूर्ण भरती प्रक्रिया ऑनलाइन हाेते. दहावीच्या गुणांवर उमेदवाराची निवड केली जाते. सन २०२३ मध्ये झालेल्या भरतीत दाेघांनी दहावीचे प्रमाणपत्र जाेडले हाेते. मात्र, हे प्रमाणपत्र बाेगस असल्याचे पुढे आले आहे.

पडताळणीत प्रकार उघड

भरतीसाठी दाेघांनी ऑनलाइन जाेडलेल्या कागदपत्रांची पडताळणी करताना दहावीच्या प्रमाणपत्राची माहिती संबंधित बाेर्डाच्या संकेतस्थळावर मिळाली नाही. त्यामुळे ही प्रमाणपत्रे संबंधित बाेर्डाकडे पाठविण्यात आली. त्यावेळी बाेर्डाकडून ही प्रमाणपत्रे आमच्याकडील नसल्याचे सांगण्यात आले. अधिक पडताळणी केल्यानंतर ही प्रमाणपत्रे खाेटी असल्याचे निष्पन्न झाले.

दाेघांची नियुक्ती रद्द

दाेघांनी जाेडलेल्या कागदपत्रांच्या आधारे त्यांची भरती प्रक्रियेत निवडही करण्यात आली हाेती. चिपळूण व दापाेली येथे त्यांची नियुक्ती करण्यात आली हाेती. मात्र, पडताळणीदरम्यान प्रमाणपत्रांबाबत शंका आल्याने त्यांची नियुक्ती राेखण्यात आली. त्यानंतर बाेगसगिरी समाेर येताच दाेघांचीही नियुक्ती रद्द करण्यात आली आहे.

Web Title : रत्नागिरी: डाक भर्ती में दसवीं के फर्जी प्रमाण पत्र का खुलासा।

Web Summary : रत्नागिरी में डाक भर्ती में दसवीं कक्षा के फर्जी प्रमाण पत्रों का घोटाला सामने आया। लातूर और नांदेड़ के दो व्यक्तियों पर पद सुरक्षित करने के लिए जाली दस्तावेजों का उपयोग करने का आरोप है। अधिकारियों ने सत्यापन के दौरान धोखाधड़ी का पता लगाया, जिसके कारण उनकी नियुक्तियां रद्द कर दी गईं और पुलिस जांच शुरू हो गई।

Web Title : Ratnagiri: Fake 10th certificates used in postal recruitment exposed.

Web Summary : A scam involving fake tenth-grade certificates in postal recruitment surfaced in Ratnagiri. Two individuals from Latur and Nanded are accused of using forged documents to secure positions. Authorities discovered the fraud during verification, leading to the cancellation of their appointments and a police investigation.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.