शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
4
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
5
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
6
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
7
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
8
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
9
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
10
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
11
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
12
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
13
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
14
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
15
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
16
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
17
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
18
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
19
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
20
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
Daily Top 2Weekly Top 5

अडीच कोटींवर उतारा २५ लाखांचा

By admin | Updated: July 8, 2014 00:18 IST

रत्नागिरी पालिका : गाळे भाडे थकबाकीदारांची नवीन शक्कल

रत्नागिरी : नगरपालिकेचे बारा व्यापारी गाळे सील केल्यानंतर या व्यावसायिकांना गाळाभाडे, घरपट्टी व पाणीपट्टी मिळून २ कोटी ६३ लाख रुपये थकबाकी भरावीच लागणार आहे. १० टक्के थकबाकी भरून गाळे ताब्यात देण्याची थकबाकीदारांची मागणी मालमत्ता नियमांच्या कसोटीवर टिकणारी नाही. पैसे भरण्यासाठी काही दिवसांची मुदत वाढवून दिली जाऊ शकते. त्या मुदतीतही थकबाकी भरली नाही, तर सील केलेल्या गाळ्यातील मालमत्तेचा लिलाव करून गाळे भाडेतत्त्वावर देण्यासाठी पालिका निविदा काढू शकते, अशी माहिती नगरपालिका सुत्रांनी दिली. रत्नागिरी पालिकेच्या मालमत्ता विभागाने २ जुलै रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास मारुती मंदिर सर्कलजवळील शिवाजी स्टेडियममधील १२ व्यापारी गाळे सील केले आहेत. त्यानंतर थकबाकी भरून गाळ्यांच्या पुन्हा ताबा देण्याकरिता पाच दिवसांची मुदत दिली होती ती आज संपुष्टात आली. त्यामुळे ही मुदत वाढवून मिळावी, थकीत भाड्याच्या रकमेपैकी १० टक्के रक्कम भरून घ्यावी, अशी मागणी करणारे निवेदन रत्नागिरी पालिकेला १२ पैकी १० थकबाकीदारांनी दिले आहे. गाळे सील केल्यानंतर पुन्हा ताबा देण्यासाठी पूर्ण थकबाकी भरणे आवश्यक असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. काही हप्त्यात रक्कम भरण्याची मुभा देण्याची वेळ केव्हाच संपली आहे. थकबाकी भरण्यासाठी आणखी तीन-चार दिवसांची मुदतवाढ मिळू शकेल. मात्र, थकीत असलेली २ कोटी ६३ लाख रुपये रक्कम भरावीच लागेल, असेही सुत्रांकडून सांगण्यात आले. दिलेल्या मुदतीत सील करण्यात आलेल्या गाळेधारकांनी थकबाकीची पूर्ण रक्कम भरली नाही तर थकबाकी भरण्याबरोबरच दंडही भरावा लागणार आहे. सील करण्यात आलेल्या बारा व्यापारी गाळ्यातील सध्या असेलेला सर्व माल, वस्तू यांचा लिलाव केला जाईल. त्यातून मिळणारी रक्कम थकबाकी म्हणून जमा केली जाईल. जप्तीनंतर २ कोटी ६३ लाख थकबाकीपोटी केवळ १० टक्के रक्कम भरणे हे नियमातच बसणारे नाही. तरीही एकूण थकबाकीच्या किमान ५० ते ६० टक्के रक्कम तत्काळ भरून व उर्वरित रकमेचे हप्ते कराराने ठरवून दिले जाऊ शकतात. अर्थात त्याबाबतचे अधिकार हे पालिका प्रशासनाला आहेत. मात्र, दंड आकारणीमुळे थकबाकीची रक्कम, त्यावरील व्याज व दंड मिळून साडेतीन कोटीपर्यंत जाण्याची शक्यता आहे. या प्रश्नी रत्नागिरीकर आक्रमक आहेत. २५ ते ३० वर्षे पालिका गाळ्यांचे भाडे थकविणाऱ्यांना कोणतीही माफी नको, त्यांच्यावर कोणत्याही परिस्थितीत कारवाई व्हायलाच हवी, अशीच सर्वसामान्यांची भूमिका आहे. त्यामुळे पालिका आता काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)