Ratnagiri: जादा परताव्याचे आमिष दाखवत वृद्धाला १८ लाखांचा गंडा, गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2026 15:39 IST2026-03-26T15:39:17+5:302026-03-26T15:39:41+5:30

एका बनावट ऑनलाइन ट्रेडिंग साईटवर खाते उघडण्यास सांगून डॉलरमध्ये गुंतवणूक करण्यास भाग पाडले

Elderly man duped of Rs 18 lakhs by promising higher returns in Dapoli | Ratnagiri: जादा परताव्याचे आमिष दाखवत वृद्धाला १८ लाखांचा गंडा, गुन्हा दाखल

Ratnagiri: जादा परताव्याचे आमिष दाखवत वृद्धाला १८ लाखांचा गंडा, गुन्हा दाखल

दापोली (जि. रत्नागिरी) : शेअर मार्केटमध्ये जादा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवत ७२ वर्षीय सेवानिवृत्त वृद्धाची तब्बल १८ लाख ३७ हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक झाल्याची घटना दापोली तालुक्यात उघडकीस आली आहे. याप्रकरणी दापोली पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दापोली तालुक्यातील गव्हे येथील एका वृद्धाशी १० डिसेंबर २०२५ ते २७ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत मयंक सिंग या संशयिताने ई-मेल व टेलिग्रामच्या माध्यमातून संपर्क साधला. शेअर मार्केटचे प्रशिक्षण देऊन मोठा आर्थिक फायदा मिळवून देण्याचे आश्वासन देत त्याने विश्वास संपादन केला. त्यानंतर एका बनावट ऑनलाइन ट्रेडिंग साईटवर खाते उघडण्यास सांगून डॉलरमध्ये गुंतवणूक करण्यास भाग पाडले.

प्रारंभी काही व्यवहारांमध्ये नफा दाखवून त्या वृद्ध व्यक्तीचा विश्वास वाढवण्यात आला. त्यानंतर अधिक नफा मिळवून देण्याच्या नावाखाली वेळोवेळी मोठ्या रकमा ऑनलाइन जमा करण्यास सांगण्यात आले. विविध टप्प्यांमध्ये एकूण १८ लाख ३७ हजार रुपये उकळण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात कोणताही परतावा मिळाला नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच या वृद्धाने पोलिसांकडे धाव घेतली. अधिक तपास दापोली पोलिस करीत आहेत.

याप्रकरणी दापोली पोलिसांनी संशयित मयंक सिंग याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ३१८ (२) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६६ (डी) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

Web Title : रत्नागिरी: वृद्ध व्यक्ति को निवेश घोटाले में ₹18 लाख की चपत

Web Summary : रत्नागिरी के दापोली के एक 72 वर्षीय सेवानिवृत्त व्यक्ति को ₹18.37 लाख का चूना लगाया गया। उसे नकली ऑनलाइन ट्रेडिंग साइट के माध्यम से शेयर बाजार में उच्च रिटर्न का लालच दिया गया। पुलिस ने संदिग्ध के खिलाफ मामला दर्ज किया है।

Web Title : Ratnagiri: Elderly Man Duped of ₹18 Lakh in Investment Scam

Web Summary : A 72-year-old retired man from Dapoli, Ratnagiri, was defrauded of ₹18.37 lakh. He was lured with high returns in the stock market via a fake online trading site. Police have registered a case against the suspect.