शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
4
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
5
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
6
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
7
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
8
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
9
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
10
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
11
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
12
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
13
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
14
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
15
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
16
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
17
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
18
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
19
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
20
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात एस. टी.साठी ४४० नवीन चालकांची नियुक्ती

By admin | Updated: February 1, 2015 00:47 IST

कैलास देशमुख : देवरुख बसस्थानकाचे काम महिनाभरात पूर्ण होणार

देवरुख : नेहमी होणाऱ्या मागणीची दखल एस. टी. महामंडळाने घेतली असून, जिल्ह्याला ४४० चालक मिळाल्याचे सांगून, यातील २८० चालकांचे प्रशिक्षण पूर्ण होऊन ते सेवेमध्ये रुजू झाले आहेत. तर १६० चालक नियुक्तीच्या प्रतिक्षा यादीवर असल्याची माहिती, एस. टी.चे जिल्हा नियंत्रक कैलास देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले की, देवरुख बसस्थानकाच्या नूतनीकरणाचे काम सध्या शेवटच्या टप्प्यात आले असून, तात्पुरत्या स्वरुपासाठीच बसस्थानकाचे स्थलांतर करण्यात आले आहे. बसस्थानकातील काँक्रीटीकरणाचे काम सध्या युद्धपातळीवर सुरु असून, येत्या २५ फेब्रुवारीपर्यंत हे काम पूर्णत्त्वास जाणार आहे. त्यानंतर, सुसज्ज व अद्ययावत असे देवरुख बसस्थानक प्रवाशांच्या सेवेसाठी खुले होणार आहे. देवरुख बसस्थनकाच्या नूतनीकरणाच्या कामाच्या पाहणीसाठी आले असता, ते बोलत होते. गेल्या तीन वर्षांपासून चालू असलेल्या बसस्थानकाच्या नूतनीकरणाच्या कामाला एस.टी. स्टँड कँटीनच्या इमारतीमुळे विलंब लागल्याचे त्यांनी मान्य केले. मात्र, २५ जानेवारीपासून येथील बसस्थानकाचे तात्पुरत्या वेळेसाठी स्थलांतर केले आहे. २५ जानेवारीपासून बरोबर एक महिन्याच्या कालावधीत बसस्थानकाचे उर्वरित काम पूर्णत्त्वास जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. ते म्हणाले की, देवरुखचा आगार महिनाभरात प्रवाशांच्या सेवेसाठी खुला करण्यात येणार आहे. मात्र, देवरूखचा आगार हा शहापूर ते बांदा येथील या पट्ट्यांमधील आगारापेक्षा सुसज्ज, अद्ययावत आणि देखणा असा २५ फेब्रुवारीनंतर पहावयास मिळणार आहे. यावेळी, विश्ोष बाब नमूद करताना ते म्हणाले की, नेहमी होणाऱ्या मागणीची दखल एस.टी. महामंडळाने घेतली असून, जिल्ह्याला ४४० चालक मिळाल्याचे सांगून यातील २८० चालकांचे प्रशिक्षण पूर्ण होऊन ते सेवेमध्ये रुजू झाले आहेत. १६० चालक प्रतिक्षा यादीवर असल्याचेही त्यांनी सांगितले. देवरुख आगाराला प्रशिक्षित २८ चालकांसोबत, १ सहाय्यक वाहतूक प्रशिक्षक आणि ७ कार्यशाळा कर्मचारी देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)