शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांना जिल्हाधिकाऱ्यांचा दिलासा

By admin | Updated: December 30, 2014 23:34 IST

पाण्याचे दुर्भिक्ष्य : पाणीच नसल्याने विद्यार्थ्यांना सुटी

रत्नागिरी : नाचणे येथील औद्योगिक प्रशिक्षण केंद्राची पाईपलाईन गंजली आहे. त्यामुळे पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवत असल्याने आठवड्यातून तीन ते चार वेळा हजेरी घेऊन विद्यार्थ्यांना सुटी देण्यात येत आहे. संबंधित प्रकारामुळे विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम मागे पडला असून, शैक्षणिक नुकसान होत आहे. याबाबत आयटीआय प्रशासन हतबल झाल्याने आज या विद्यार्थ्यांनीच जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी पाईपलाईनची दुरूस्ती होईपर्यंत टँकरने पाणीपुरवठा करण्यात येईल, असा दिलासा दिला आहे.शहरातील नाचणे येथील औद्योगिक प्रशिक्षण केंद्राची पाईपलाईन अनेक वर्षांपासून गंजलेली आहे. त्यामुळे संस्थेला पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवत आहे. या समस्येमुळे त्रस्त झालेल्या विद्यार्थ्यांनी प्राचार्यांना कल्पना दिली होती. मात्र, आयटीआय प्रशासनाने याबाबत हतबलता दर्शवीत आपण नगरपरिषदेकडे सातत्याने पाठपुरावा केला असून, जिल्हाधिकारी यांनाही निवेदन दिल्याचे या विद्यार्थ्यांना सांगितले. अधूनमधून आयटीआय प्रशासनाकडून एखादा टँकर मागवला जात होता. मात्र, त्याद्वारे मिळणारे पाणी अपुरे असेच आहे. आता तर या मुलांना पाण्याची समस्या अधिकच भेडसावू लागली आहे. गंजलेल्या पाईपलाईनमुळे सुमारे ८०० ते ९०० विद्यार्थ्यांना पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवत आहे. त्यामुळे आठवड्यातून तीन ते चार वेळा हजेरी घेऊन विद्यार्थ्यांना सुटी देण्यात येत आहे. वसतिगृहात असलेल्या ४० मुलांची समस्या तर अधिकच बिकट आहे. त्यांना पाण्याअभावी जेवणासह सर्वच बाबतीत गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. संबंधित प्रकारामुळे विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम मागे पडला असून, शैक्षणिक नुकसान होत आहे. अखेर आज सुमारे ३५० विद्यार्थी जिल्हाधिकारी कार्यालयावर थडकले. यावेळी पाच विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांची भेट घेतली आणि त्यांना आपल्या या समस्येबाबतचे निवेदन सादर केले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी या मुलांची समस्या ऐकून घेतली. आयटीआय प्रशासनाने पाईपलाईनच्या दुरूस्तीसाठी तयार केलेल्या प्रस्तावात त्रुटी आहेत. त्यामुळे ही पाईपलाईन बदलण्यास विलंब होईल. अर्थात त्यासाठी लवकरात लवकर हे काम पूर्ण करण्यासाठी यात स्वत: लक्ष घालण्यात येईल. असे त्यांनी सांगितले. तोपर्यंत टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी संबंधित विभागाला त्वरित आदेश काढण्याची ग्वाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. जिल्हाधिकाऱ्यांनीच ही जबाबदारी घेतल्याने या विद्यार्थ्यांनी सुटकेचा श्वास घेतला आहे. (प्रतिनिधी)