खेड राष्ट्रवादीतर्फे मास्कचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:28 IST2021-04-26T04:28:13+5:302021-04-26T04:28:13+5:30

खेड : शहरातील नगरपरिषदेच्या दवाखान्यात सुरू असलेल्या लसीकरण केंद्रातील नागरिकांना २०० मास्क व लसीकरण केंद्रातील कर्मचाऱ्यांना शहर राष्ट्रवादी ...

Distribution of masks by Khed NCP | खेड राष्ट्रवादीतर्फे मास्कचे वाटप

खेड राष्ट्रवादीतर्फे मास्कचे वाटप

खेड : शहरातील नगरपरिषदेच्या दवाखान्यात सुरू असलेल्या लसीकरण केंद्रातील नागरिकांना २०० मास्क व लसीकरण केंद्रातील कर्मचाऱ्यांना शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे २०० पीपीई कीट व ४०० मास्क, हॅडग्लोव्हज्‌ देण्यात आले.

तसेच खेड पोलीस स्थानकातील अधिकारी व कर्मचारी यांना २०० मास्कचे वाटप करण्यात आले. त्यानंतर कशेडी तपासणी नाका येथील पोलीस कर्मचारी-अधिकारी व इतर शासकीय कर्मचारी व डाॅक्टर, वाहतूक पोलीस यांना २०० मास्कचे वाटप करण्यात आले.

यावेळी माजी आमदार संजय कदम, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, नगराध्यक्ष वैभव खेडेकर, नगरसेवक तौसिफ खोत, इलयास खतीब, नगरसेविका जयमाला पाटणे, राजेश संसारे, विनायक निकम, सागर कवळे, शैलेश धारिया, राजू आंब्रे, प्रणव म्हापुसकर, विराज जैन, तुषार सापटे, विकी कदम, दादू नांदगावकर, रहिम सहिबोले, राहुल पाटणे, सिध्देश पाटणे तसेच सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

...........................................

khed-photo252

खेड राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे माजी आमदार संजय कदम यांच्याहस्ते अधिकारी व कर्मचाऱ्यांना मास्कचे वाटप करण्यात आले.

Web Title: Distribution of masks by Khed NCP