शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
2
IPL 2026 : "घासून नाही, ठासून हरवलं "! MI चं विक्रमी विजयासह दमदार कमबॅक; GT ला पहिल्यांदाच दिली मात
3
औराद शहाजानी परिसरात उष्माघाताने शेतकऱ्याचा मृत्यू; साेमवारी तापमान पाेहोचले ४२.८ अंशावर
4
'लिव्ह इन पार्टनर'च्या छळाला कंटाळून ५१ वर्षीय महिलेकडून आत्महत्येचा प्रयत्न, मृत्यू झाल्यावर गुन्हा दाखल
5
कार्यकर्ता अपमानित होतो, तेव्हा माझ्यातील शिवसैनिक जागा : एकनाथ शिंदे
6
९३ दिवसांचा थरार अन् 'ऑपरेशन महादेव' फत्ते! पहलगामच्या मारेकऱ्यांचा असा घेतला भारतीय सैन्याने बदला!
7
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
8
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला ७ हजार आंब्यांचा महानैवेद्य; अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ट्रस्टकडून आंबा महोत्सव 
9
Tilak Varma Maiden IPL Hundred : तिलक वर्माची अविश्वसनीय सेंच्युरी; MI साठी ठरला खरा संकटमोचक!
10
Travel : भारतात आहे चक्क मंगळ ग्रहासारखी जागा! पर्यटकांची पहिली पसंती; 'हे' अजब ठिकाण पाहिलेत का?
11
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
12
GT vs MI : स्टंप तोड गोलंदाजी! षटकारासह स्वागत झाल्यावर रबाडानं असा घेतला सूर्या दादाचा बदला (VIDEO)
13
पतीच्या मैत्रिणीस अडकवण्यासाठी चाकुरात पत्नीने केला पुतण्याचा खून; 'असा' झाला उलगडा
14
सराफवाडी येथे माय लेकाची गळफास घेवून आत्महत्या; कारण अस्पष्ट, वालचंदनगर पोलिसांकडून तपास सुरू 
15
गुंतवणूकदार मालामाल! १० वर्षांत पैशांचा पाऊस पाडणाऱ्या कंपनीचा स्टॉक होणार स्प्लिट; रेकॉर्ड डेट जाहीर
16
पाेटच्या दाेन चिमुकल्यांसह मातेने विहिरीत उडी घेत संपवले जीवन! खरोसा गावावर शोककळा
17
"अजित डोभाल अचानक सौदीला का गेले?"; इराण-अमेरिका संघर्षात भारतानं फेकला 'हुकमी एक्का'; मोठ्या 'गेम"ची तयारी
18
GT vs MI : कोण आहे Danish Malewar? रोहित शर्माच्या जागी मुंबई इंडियन्सनं विदर्भकारावर खेळला मोठा डाव; पण...
19
सौदीच्या एका शब्दाखातर पाकिस्तानने मोडला ४२ हजार कोटींचा करार! सुदानला मोठा झटका!
20
इराणमध्ये तख्त पालटले...! इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने घेतला देशाचा ताबा; अब्बास अराघची बाजुला पडले 
Daily Top 2Weekly Top 5

कोयना जलविद्युत प्रकल्पांतर्गत नदीकिनाऱ्यावरील मकिंगची विल्हेवाट लावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:36 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क चिपळूण : दरवर्षी पूरपरिस्थिती व नदीतील गाळाचा प्रश्न निर्माण होत आहे. त्यासाठी कोयना जलविद्युत प्रकल्पांतर्गत नदीकिनाऱ्यावर ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

चिपळूण : दरवर्षी पूरपरिस्थिती व नदीतील गाळाचा प्रश्न निर्माण होत आहे. त्यासाठी कोयना जलविद्युत प्रकल्पांतर्गत नदीकिनाऱ्यावर टाकलेल्या मकिंगची विल्हेवाट लावणे गरजेचे असून, हे काम तातडीने करावे, अशी मागणी जलदूत शाहनवाज शाह यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, पूर्वी वाशिष्ठी नदीवरील गोवळकोट बंदर येथे मोठमोठ्या बोटी येत. तसेच चिपळूण शहरातील बाजारपुलाजवळ असणारा बंदर नाका येथे मोठमोठी शिडाची गलबते येत. या ठिकाणी नगर परिषदेचा जकात नाकाही होता. सन १९५१ ला कोयना जलविद्युत प्रकल्पाचे सर्वेक्षण सुरू झाले व त्याला १९५३ मध्ये मंजुरी मिळाली. प्रत्यक्ष कामाला सुरुवात ही १९५४ साली झाली. या प्रकल्पाचे सर्व अवजड सामान व यंत्रसामग्री गोवळकोट धक्का येथे बोटीद्वारे येऊन ती मोठ्या वाहनाने कोयना धरणावर नेण्यात आली. परंतु, आता वाशिष्ठी नदी ही पूर्णपणे दगड-गोटे मकिंग व गाळाने भरलेली आहे.

या विद्युत प्रकल्पामध्ये चारीही स्तरांवर विद्युतनिर्मितीकरिता मोठमोठे बोगदे खणण्यात आले. या बोगद्यांतून निघालेले अब्जा-अब्जावधी घनमीटर दगडगोटे व मकिंग हे येथून निघणाऱ्या उपनदी व नदीकिनारी ठेवण्यात आलेले आहेत. याबाबत अद्याप कोणताही शासकीय अधिकारी व शासनाने कोणताही विचार केलेला नाही. हे नदीकिनारी असणारे अब्जा-अब्जावधी घनमीटर दगडगोटे व मकिंग पावसाच्या काळात हे वाशिष्टी नदीमध्ये येतात व त्यामुळे नदीपात्राची खोली कमी होत आहे. या नदीतील गाळ जरी काढण्यात आला तरी हे चक्र पुनश्च जोमाने सुरू होते. २२ जुलै २०२१ रोजी कोळकेवाडी धरणातून विद्युतनिर्मितीकरिता जाणाऱ्या बोगद्याच्या ठिकाणी वरील भागावरील साठा करून ठेवलेले हजारो घनमीटर दगडगोटे व मकिंग वाहून या ठिकाणी आले व चौथ्या स्तरावरील विद्युतनिर्मिती बंद झाली. येथील हे दगडगोटे व मकिंग काढण्याचे काम आजही सुरू आहे. कोयना जलविद्युत प्रकल्पाच्या पोफळी, कोळकेवाडी, अलोरे ते अगदी कान्हे पिंपळीपर्यंत प्रत्येक ठिकाणी दगडगोटे व मकिंग यांचा जो साठा करून ठेवला आहे, त्याची विल्हेवाट लावण्यात यावी, अशी मागणी शाह यांनी केली आहे.