शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

इंग्रजकालीन बंदर धक्का परिसराच्या विकासाला चालना मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क राजापूर : शहरातील बंदर धक्का येथील अर्जुना-कोदवली नद्यांचा संगम परिसर पर्यटनदृष्ट्या विकसित करण्यासाठी माजी आमदार अ‍ॅड. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

राजापूर : शहरातील बंदर धक्का येथील अर्जुना-कोदवली नद्यांचा संगम परिसर पर्यटनदृष्ट्या विकसित करण्यासाठी माजी आमदार अ‍ॅड. हुस्नबानू खलिफे यांनी राज्याच्या पर्यटनमंत्री आदिती तटकरे यांच्याकडे पर्यटन विकास योजनेंतर्गत २५ लाख रुपयांच्या निधीची मागणी केल्याची माहिती नगराध्यक्ष अ‍ॅड. जमीर खलिफे यांनी दिली. त्याला आदिती तटकरे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत तत्काळ प्रस्ताव सादर करण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे. त्यामुळे राजापूरच्या ब्रिटिशकालीन इतिहासाचा मूक साक्षीदार असलेल्या बंदर धक्याच्या विकासाला गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

शहरातून वाहणाऱ्या अर्जुना आणि कोदवली नद्यांचा बंदर धक्का येथे संगम होऊन तेथून पुढे त्या एकत्रितपणे वाहतात. बंदर धक्का परिसर आणि येथील दोन्ही नद्यांचा संगम परिसर राजापूर शहराला लाभलेल्या ब्रिटिशकालीन इतिहासाच्या मूक साक्षीदार आहे. खोलगट भाग असलेल्या या संगमातून पूर्वी मालवाहतूक करणाऱ्या बोटी, जहाजे, गलबते येत होती. त्यांच्यामधून येणारा माल बंदर धक्का येथे उतरविला जात होता. तेथून पुढे घाटमाथ्यावर त्या-त्या भागामध्ये पोहोचविला जात होता. या साऱ्या घडामोडींमधन ब्रिटिशकाळामध्ये राजापूर शहराचा प्रसिद्ध निर्यातकेंद्र म्हणून नावलौकिक होता. कालपरत्वे त्यामध्ये बदल झाला असला तरी, त्या वेळचा इतिहास आणि अनेक घडामोडींचा हा परिसर मूक साक्षीदार आहे.

नद्यांच्या संगमाच्या येथील परिसराचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्याच्या दृष्टीने नगराध्यक्ष अ‍ॅड. जमीर खलिफे यांच्या मार्गदर्शनाखाली नगर परिषदेचे प्रयत्न सुरू आहेत. त्या अनुषंगाने माजी आमदार खलिफे यांनी राज्याच्या पर्यटनमंत्री तटकरे यांच्याकडे पर्यटन विकास योजनेंतर्गत २५ लाख रुपये निधीची निवेदनाद्वारे मागणी केली आहे. त्याला श्रीमती तटकरे यांनीही सकारात्मक प्रतिसाद देत जिल्हाधिकाऱ्यांना तत्काळ प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत, असे नगराध्यक्ष अ‍ॅड. खलिफे यांनी सांगितले.