खालगाव-जाकादेवी येथे दाेघे पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:20 IST2021-07-03T04:20:26+5:302021-07-03T04:20:26+5:30

जाकादेवी : खालगाव-जाकादेवी येथे ग्रामपंचायत खालगाव आणि प्राथमिक आरोग्य केंद्र, जाकादेवी यांच्या संयुक्त विद्यमाने परिसरातील १०७ जणांची गुरूवारी कोरोना ...

Daeghe positive at Khalgaon-Jakadevi | खालगाव-जाकादेवी येथे दाेघे पॉझिटिव्ह

खालगाव-जाकादेवी येथे दाेघे पॉझिटिव्ह

जाकादेवी : खालगाव-जाकादेवी येथे ग्रामपंचायत खालगाव आणि प्राथमिक आरोग्य केंद्र, जाकादेवी यांच्या संयुक्त विद्यमाने परिसरातील १०७ जणांची गुरूवारी कोरोना चाचणी करण्यात आली. त्यापैकी दाेघांचे अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत. त्यांना रत्नागिरी येथे उपचारासाठी पाठविण्यात आले आहे.

खालगाव-जाकादेवी परिसरात कन्टेनमेंट झोन जाहीर झाला असून, अत्यावश्यक सेवा वगळता बाजारपेठ गेले पाच दिवस बंद ठेवण्यात आली आहे. जाकादेवी, खालगाव परिसरात जे रुग्ण पॉझिटिव्ह आढळत आहेत, त्यांना तत्काळ वाहनाची सोय करून देणे, त्यांना धीर देऊन त्यांचे मनोबल वाढवणे, त्यांना मानसिक आधार देण्याचे काम जाकादेवी खालगाव येथील व्यापारी व काही युवक करत आहेत. यामध्ये खालगावचे सरपंच प्रकाश खोल्ये, उपसरपंच कैलास खेडेकर, व्यापारी रोहित कोळवणकर, अमित कोळवणकर, प्रतीक देसाई, राजू कोवळे, प्रकाश भुर्के, बंटी सुर्वे, सागर गोताड, वैभव गोताड यांचा समावेश आहे. तसेच रुग्णांच्या घरी जाऊन खासगी वाहनांच्या माध्यमातून प्राथमिक आरोग्य केंद्रात आणणे तसेच पुढील शासकीय वाहनाची सोय करणे अशी कामे ही मंडळी करत आहेत.

------------------------------------------------

जाकादेवी-खालगाव परिसरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या मदतीसाठी तरुण व व्यापारी सज्ज आहेत.

Web Title: Daeghe positive at Khalgaon-Jakadevi