शहरं
Join us  
Trending Stories
1
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
2
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
5
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
6
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
7
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
9
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
10
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
11
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
12
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
13
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
14
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
15
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
16
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
17
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
18
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
19
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
20
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
Daily Top 2Weekly Top 5

संचारबंदीमुळे ग्राहक कमी; आंब्याचे दर आले आवाक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 12:51 IST

Mango Ratnagiri : बदलत्या हवामानाचा फटका आंबा पिकाला बसला असल्याने उत्पादनात कमालीची घट झाली आहे. दुसऱ्या टप्प्यातील आंबा बाजारात विक्रीला येऊ लागला आहे. वाशीतील एपीएमसी मार्केटमध्ये ४० ते ४५ हजार आंबा पेट्या विक्रीसाठी पाठविण्यात येत आहेत. कोरोनामुळे कडक संचारबंदी असल्याने ग्राहकांचा फारसा प्रतिसाद लाभत नसल्याने दर मात्र गडगडले आहेत.

ठळक मुद्देवाशी मार्केटमध्ये दरात घसरण,जास्त उत्पन्नासाठी आंबा बाहेरच.ऋतुचक्रातील बदलामुळे आंबा पीक दिवसेंदिवस धोक्यात, स्थानिक बाजारात आंबा विक्री करण्यावर कमी भर

रत्नागिरी : बदलत्या हवामानाचा फटका आंबा पिकाला बसला असल्याने उत्पादनात कमालीची घट झाली आहे. दुसऱ्या टप्प्यातील आंबा बाजारात विक्रीला येऊ लागला आहे. वाशीतील एपीएमसी मार्केटमध्ये ४० ते ४५ हजार आंबा पेट्या विक्रीसाठी पाठविण्यात येत आहेत. कोरोनामुळे कडक संचारबंदी असल्याने ग्राहकांचा फारसा प्रतिसाद लाभत नसल्याने दर मात्र गडगडले आहेत.ऋतुचक्रातील बदलामुळे आंबा पीक दिवसेंदिवस धोक्यात येत आहे. उत्पादनामध्ये कमालीची घट झाली आहे. मुंबई उपनगरात दहा हजारपेक्षा अधिक किरकोळ व्यापारी, तर वाशी मार्केटमध्ये ६०० घाऊक व्यापारी आहेत. वाशी येथून हापूस खरेदी करून उपनगरातून विकण्यात येतो. बहुतांश शेतकरी वाशी मार्केटवर अवलंबून आहेत. मात्र गेल्या पाच - सहा वर्षाच्या तुलनेत यावर्षी हापूसच्या उत्पादनावर कमालीचा फरक पडला आहे. सध्या ४० ते ४५ हजार पेट्या वाशी मार्केटमध्ये कोकणातून जातात.कोरोनामुळे गर्दी टाळण्यासाठी सकाळ व दुपारच्या सत्रात आंबा विक्री सुरू आहे. मात्र संचारबंदीमुळे ग्राहकांचा प्रतिसाद फारसा लाभत नाही. त्यामुळे दरावर परिणाम झाला आहे. गत आठवड्यापेक्षा दोन हजाराने दर गडगडले आहेत. एक हजार ते २५०० रुपये दराने आंबा पेटी आहे.उत्पादन कमी असल्याने दर अद्याप टिकून होते. महागाईमुळे आंबा उत्पादन खर्चात वाढ झाली आहे. मात्र आता संचारबंदीमुळे दर गडगडल्याने उत्पादन खर्च वसूल होणे अवघड बनले आहे. खासगी विक्रेते जाग्यावर २५०० ते ३००० रुपये दराने पेट्या खरेदी करीत असल्याने हमाली, वाहतूक खर्च वाचत असल्याने स्थानिक विक्री परवडत आहे. कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश येथून केसर, बदामी, लालबाग, तोतापुरी, कर्नाटक हापूसची आवक सुरू आहे.

यावर्षी हापूस उत्पादन कमी असल्यामुळे गेल्या पाच-सहा वर्षाच्या तुलनेत आवक घटली आहे. आखाती प्रदेश व युरोपमधून आंब्याला मागणी आहे. मात्र संचारबंदीमुळे उपनगरांतील ग्राहकांचा फारसा प्रतिसाद नसल्यामुळे विक्रीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे दरही कोसळले आहेत.- संजय पानसरे,संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती, वाशी.

टॅग्स :MangoआंबाRatnagiriरत्नागिरी