शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची पराभवाची हॅटट्रिक; दिल्ली कॅपिटल्सच्या विजयासह प्लेऑफ्सच्या शर्यतीत नवं ट्विस्ट
2
अबुधाबीमध्ये मोठा ड्रोन हल्ला; न्यूक्लियर प्लँट नष्ट करण्याचा प्रयत्न; पुन्हा युद्धाचे ढग?
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्वीडनचा सर्वोच्च सन्मान प्रदान; ठरला ३१वा जागतिक पुरस्कार!
4
DC vs RR: विक्रमी अर्धशतकानंतर रियान परागचा रुबाब; सेलिब्रेशनमुळे नवा वाद, नेमकं काय घडलं?
5
रेल्वे ठेकेदारच्या हलगर्जीपणामुळे अडकली कुत्र्यांची पिल्ले, कसारा यार्डमधील विचित्र प्रकार
6
निसर्गाचा मोठा चमत्कार! भीषण ST बस अपघातात ६ महिन्यांची गरोदर महिला सुखरूप
7
'दर्जे'दार! पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला 'अ' वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा
8
ना 'डील', ना ठोस आश्वासन... डोनाल्ड ट्रम्प चीनवरून रिकाम्या हाती परतले, आता पुढे काय करणार?
9
ठाणे: मिठबंदर खाडीत बेपत्ता व्यक्तीचा शोध अखेर थांबवला; चार दिवसांपासून सुरू होते शोधकार्य
10
ST बसचा कल्याण-नगर मार्गावर भीषण अपघात! चालक, प्रवाशाचा मृत्यू; २० जण जखमी
11
युक्रेनचा मॉस्कोवर आतापर्यंतचा सर्वात मोठा ड्रोन हल्ला; एका भारतीय कामगाराचा मृत्यू, ३ जखमी
12
Vaibhav Suryavanshi Record : १५ वर्षीय वैभव सूर्यवंशी भारताचा नवा सिक्सर किंग! अभिषेक शर्माचा विक्रम मोडला
13
३० जूनपूर्वी कर्जमाफी जाहीर करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा (video)
14
PM मोदींच्या आवाहनाचा काय परिणाम झाला! किती टक्के नागरिकांनी एक वर्षं सोनं न खरेदी करण्याचा निर्णय घेतला? सर्व्हेतून मोठा खुलासा
15
RCB Qualify For IPL 2026 Playoffs : गत चॅम्पियन बंगळुरु प्लेऑफ्स गाठणारा पहिला संघ; पंजाबचा खेळ खल्लास?
16
२०५ तक्रारी, १५ कोटींची फसवणूक... देशभरातील लोकांना लुटणाऱ्या आरोपीचा पर्दाफाश
17
Video: पुणेकरांसाठी खुशखबर..! सरकारी दरात मिळणार कॅन्सर उपचार; सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू
18
सिंधू जल करारासंदर्भात भारताची आक्रमक भूमिका! हेग लवादाचा निकाल फेटाळला; आता काय करणार पाकिस्तान?
19
अन्याय सहन करणार नाही”; ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांनी शासनाचा जीवन गौरव पुरस्कार परत केला
20
शनि अमावस्येच्या रात्री दोघांची हत्या; धुळ्यात भोंदू बाबाचं कृत्य, सगळं केलं पण एका चुकीने अडकला
Daily Top 2Weekly Top 5

सव्वाचार कोटींची अफरातफर

By admin | Updated: April 18, 2015 02:32 IST

पदाचा दुरुपयोग करून कर्मचारी सहकारी पतसंस्थेला सव्वाचार कोटींचा गंडा घालणाऱ्या सिंधी हिंदी स्कूल कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या ....

नागपूर : पदाचा दुरुपयोग करून कर्मचारी सहकारी पतसंस्थेला सव्वाचार कोटींचा गंडा घालणाऱ्या सिंधी हिंदी स्कूल कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या तीन माजी पदाधिकाऱ्यांना अखेर गुन्हेशाखेने जेरबंद केले. जयंत विशनदास तोलानी (वय ५९, रा. जरीपटका), हुंदाराज माणिकराय तोलानी (वय ५४, रा. हुडको कॉलनी) आणि भागचंद अर्जुनदास चेलानी (वय ६२, रा. हिंगणा टी पॉर्इंट) अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी त्यांना कोर्टात हजर करून त्यांची २२ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीही मिळवली.
पाचपावलीत सिंधी हिंदी हायर सेकंडरी स्कूल कर्मचारी सहकारी पतसंस्था आहे. संस्थेचे ४०० सभासद असून, आरोपी भागचंद चेलानी हे प्रारंभी संस्थेचे सचिव होते. त्यानंतर लेखापाल जयंत तोलानी यांनी सचिवपदाचा कार्यभार सांभाळला. या दोघांसोबत त्यावेळी हुंदाराज तोलानी रोखपाल होते. २००० ते २००८ या कालावधीत या तिघांनी बनावट कागदपत्रे आणि नोंदी करून ८ वर्षात ४ कोटी, १७ लाख, ७५ हजारांची अफरातफर केली. हा गैरप्रकार उघडकीस आल्यानंतर इतर सभासदांनी २००९ मध्ये पाचपावली ठाण्यात तक्रार दाखल केली. प्रकरण कोट्यवधींच्या फसवणुकीचे असल्यामुळे त्याचा तपास गुन्हेशाखेकडे सोपविण्यात आला. गुन्हेशाखेच्या पोलिसांनी उपरोक्त तिघांविरुद्ध गुन्हे दाखल करून त्यांच्या अटकेची तयारी करताच आरोपींनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली. प्रकरण उच्च न्यायालयात नेले. उच्च न्यायालयाने त्यांचा अटकपुर्व जामीन नामंजूर केला. (प्रतिनिधी)
६ वर्षानंतर आरोपींना अटक
या प्रकरणाची माहिती कळताच गुन्हेशाखेचे अतिरिक्त आयुक्त श्रीकांत तरवडे, उपायुक्त दीपाली मासिरकर यांनी आरोपींना तातडीने अटक करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोलीस निरीक्षक सुरेश मदने, शिपाई गजानन शिंदे, अर्चना विलायतकर यांनी शोधाशोध करून तिघांनाही अटक केली. त्यांना कोर्टात हजर करून त्यांची २२ एप्रिलपर्यंत कोठडी मिळवली. त्यामुळे ६ वर्षांपासून रेंगाळत असलेल्या या प्रकरणातील बाबी आता उजेडात येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.